मुंडगाव परिसरामध्ये ओवा या पिकाची खरीप व रब्बीच्या मधात ४० ते ५० टक्के पेरणी केली आहे. यामध्ये हे पीक कमी पावसाचे असून या पिकापासून शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न अपेक्षित असताना शेतकऱ्यांनी खर्च सुद्धा केला आहे. परंतु या पिकाला पाऊस अधिक झाल्यामुळे नुकसान होत आहे. ओवा पेरलेल्या क्षेत्रफळामध्ये जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तणाचे प्रमाण खूप वाढले आहे.
ट्रॅक्टरद्वारे ओव्याचे पीक वखरले!
बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील ओवा पिकाची परिस्थिती आणि उत्पन्नाची शाश्वती नसल्यामुळे शेतात ट्रॅक्ट्रर घालून रब्बी पिकातील हरभरा पिकाच्या पेरणीकरिता शेत तयार करण्यास सुरवात केली आहे. परिसरातील शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे ओवा पिकाचा महसूल विभागाने सर्वे करून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.