अकोला: नुकताच दहावीचा निकाल लागला असून, २४ हजार विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. या उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ५ हजार ७८0 विद्यार्थी विशेष प्रावीण्य श्रेणीत तर ८ हजार ३0४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती ही विज्ञान शाखेलाच असल्याचे त्यांच्या टक्केवारीतून दिसून येते. विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रात करियर करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल दिसून येत आहे.अकरावी विज्ञान शाखेच्या केंद्रीय पद्धतीने आॅफलाइन प्रवेश प्रक्रियेला १३ जूनपासून प्रारंभ झाला आहे. अकोला शहरात विज्ञान शाखा असलेले ५३ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमध्ये ८ हजार विज्ञान शाखेच्या जागा आहेत. या जागांवर विद्यार्थ्यांना सहज प्रवेश मिळावा, या दृष्टिकोनातून माध्यमिक शिक्षण विभागाने गतवर्षीपासून केंद्रीय पद्धतीने आॅफलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू केली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल सर्वाधिक लागला आहे. यातही मुलींच्या यशाची टक्केवारी ८९ टक्के आहे. यंदा १४ हजार ७४ विद्यार्थी हे विशेष प्रावीण्य आणि प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. शिक्षण तज्ज्ञांच्या मते हे सर्व विद्यार्थी विज्ञान शाखेकडे कल असणारे आहेत. शहरात सर्वाधिक ११ हजार विद्यार्थी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी ८ हजार विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेला प्रवेश देण्यात येणार आहे आणि उर्वरित सहा हजार विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील विज्ञान शाखा असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. उर्वरित १0 हजार विद्यार्थी कला, वाणिज्य शाखेसोबतच, तंत्रशिक्षण, एमसीव्हीसी, आयटीआय शाखेकडे वळणार असल्याचे एकंदरीत या विद्यार्थ्यांच्या टक्केवारीवरून स्पष्ट होते. (प्रतिनिधी)दहावी उत्तीर्ण झालेले एकूण विद्यार्थीविशेष प्रावीण्य श्रेणी - ५७८0प्रथम श्रेणी - ८२९४द्वितीय श्रेणी - ७९४६पास श्रेणी - २0३२..............................................................एकूण - २४0५२