अकोला : शहरात वराहांची संख्या मोठी आहे. रस्त्याच्या मधून जाणार्या वराहांमुळे अपघाताची शक्यता तर राहतेच, पण त्यापेक्षा स्वाइन फ्लूसारख्या आजारांची शक्यताही वाढली आहे. याबाबत महापौर आणि नगरसेवकांनी केलेल्या तक्रारीनंतर शहरातील १५ हजारांवर वराह शहराबाहेर काढण्याचे नियोजन महापालिका प्रशासन करीत आहे. अकोला शहरात २00 कुटुंबांकडून वराहपालनाचा व्यवसाय केला जातो. या वराहांच्या झुंडी शहरात सर्वत्र फिरताना दिसतात. ते रस्त्याच्या मधून जात असताना वाहनांचा अपघात झाल्यामुळे अनेकांना गंभीर स्वरूपाच्या दुखापतीस सामोरे जावे लागले आहे. वराहांच्या झुंडीमुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पाहावयास मिळते. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी वराहपालनाचा व्यवसाय शहराबाहेर करण्याचा आदेश आयुक्तांनी गुरुवारी वराह पालक-मालकांना दिला. त्यांनी यासाठी १५ दिवसांचा वेळ मागितला आहे. त्यानंतर प्रशासनातर्फे सक्तीने वराह शहराबाहेर काढण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
१५ हजार वराह होणार हद्दपार!
By admin | Published: November 27, 2015 1:52 AM