अकोला : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ होईल, या आशेवर असलेल्या वीज ग्राहकांनी महावितरणचे कोट्यवधींची देयके थकविली आहेत. नागपूर प्रादेशिक विभागातील तब्बल २०२११६२ वीज ग्राहकांनी १ एप्रिल २०२० पासून एकही वीज बिल भरले नाही. सर्व प्रकारच्या लघुदाब ग्राहकांनी तब्बल ७३५४.९ कोटी रुपये थकविल्याने महावितरणचा थकबाकीचा डोंगर वाढला आहे. कोरोना काळात महावितरणकडून मीटर रिडिंग घेेणे बंद करण्यात आले होते. या काळात सरासरी वीज बिल देण्यात आले. ही बिले अवाजवी आकारल्याचा आरोप करीत अनेक ग्राहकांनी भरणा केला नाही. त्यामुळे थकबाकी वाढतच गेली. महावितरणच्या नागपूर प्रादेशिक विभागातील ११ जिल्ह्यांमधील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी, पथदीप, सार्वजनिक पाणी पुरवठा योजना, सार्वजनिक सेवा व इतर अशा विविध प्रकारातील २०२११६२ वीज ग्राहकांनी १ एप्रिल २०२० पासून एकही वीज बिल भरले नसल्याची आकडेवारी समोर आली आहे. या ग्राहकांची थकबाकी ७३५४.९ कोटी रुपये असल्याने महावितरण चांगलीच अडचणीत आली आहे.
अशी आहे थकबाकी
वर्गवारी ग्राहक थकबाकी (कोटीमध्ये)
घरगुती १२८९७७९ ८५०.२
वाणिज्यिक ९८८६२ १३२.२
औद्योगिक १३५६१ ४८.९
कृषी ५७९४८३ ४९१८.८
पथदीप १६२८३ ११८५.८
सार्वजनिक पाणी पुरवठा ८६२५ २०१.६
सार्वजनिक सेवा १३५७८ १४.९
इतर ९९१ २.५
०००००००००००००००००००००००००००००००००००००००
एकूण २०२११६२ ७३५४.९७३५४.९