अकोला: विधानसभा निवडणुक 2019 ची घोषणा होताच निवडणुक आदर्श आचार संहितेचा अंमल सुरु झाला. आचारसंहितेची तात्काळ अंमलबजावणी करीत जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघातुन 4032 पोस्टर्स, बॅनर्स, झेंडे आदी हटविण्यात आले आहेत, अशी माहिती आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी कक्षातुन देण्यात आली आहे.यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघातुन 4032 पोस्टर्स, होर्डीग्ज, बॅनर्स वरिल राजकीय पक्षाचे मजकुर हटविण्यात आले. त्यात भिंतीवरील मजकुर मिटविण्यात आले, कोनशिला झाकण्यात आल्या आहेत. 485 ठिकाणांवरुन झेंडेही हटविण्यात आले आहेत. शासकीय मालमत्तांवर लावलेले 82 भिंतीवरील मजकुर, 592 पोस्टर्स, 45 होर्डीग्ज, 553 बॅनर्स यांचा समावेश आहे. सार्वजनिक मालमत्तांवरील 176 भिंतीवरील मजकुर, 709 पोस्टर्स, 527 होर्डीग्ज, 521 बॅनर्स व 268 झेंडे असे 2201 मजकुर हटविण्यात आले, तर खाजगी मालमत्तांवरील 62 ठिकाणी भिंतीवरील मजकुर, 144 पोस्टर्स, 108 होर्डीग्ज, 210 बॅनर्स असे 524 ठिकाणी मजकुर हटविण्यात आले. जिल्ह्यात 105 ठिकाणी मालमत्ता विद्रुपीकरण अंतर्गंत कार्यवाही ही करण्यात आली आहे. ही माहिती सोमवार दि. 23 रोजी पर्यंत झालेल्या कार्यवाहीची असुन आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी कक्षातुन प्राप्त झाली आहे.
vidhan sabha 2019 : चार हजारांहुन अधिक पोस्टर्स, बॅनर्स हटवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 6:33 PM