अकोला : यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षाऑनलाइन पद्धतीने संपूर्ण महाराष्टÑभर कालपासून सुरळीत सुरू झाल्या, अशी माहिती कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी दिली.विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी अतिशय प्रभावी आणि सुटसुटीत ऑनलाइनपरीक्षा प्रणाली तयार केल्यामुळे दोन दिवसांत राज्यभरातून या परीक्षेला सरासरी ८५ टक्क्यांहून अधिक विद्यार्थी सामोरे गेले. ऑनलाइन परीक्षा विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीच्या वेळेत देता यावी, अशी लवचिकता ठेवण्यात आली आहे. विविध शिक्षणक्रमांकरिता ठरवून दिलेल्या दिवसाच्या प्रहरातील निर्धारित पाच तासांपैकी कोणत्याही सलग दोन तासात विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात.
ऑनलाइन परीक्षेला ८३ टक्क्यांहून अधिक प्रतिसादएकूण १ लाख ९० हजार ३३९ परीक्षार्थी असून, ५ आॅक्टोबरपासून तीन दिवसात एक लाख विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या आॅनलाइन परीक्षा दिली. परीक्षार्थीसाठी अभ्यासक्रमनिहाय सकाळी ८ ते दुपारी १ व ३ ते रात्री ८ असे दोन सत्र दिले असून, त्यांनी या पाच तासांपैकी कोणत्याही एका तासात पेपर द्यायचा आहे. एकूण ६० गुणांच्या पेपरसाठी ५० प्रश्न दिले जात असून, त्यापैकी कोणतेही ३० सोडवायचे आहेत. मोबाइल, लॅपटाप, संगणक, यापैकी कोणतेही उपकरण याऑनलाइन परीक्षेकरिता वापरता येऊ शकते, विविध विभागीय केंद्रांना विद्यार्थी सहायता कक्ष सुरू करण्यात आला असून, हेल्पलाइननंबरही परिक्षार्थींना देण्यात आले आहेत. विद्यार्थीकडून परीक्षा पद्धती अतिशय सोपी व सुटसुटीत असल्याच्या प्रतिक्रिया विद्यापीठास येत आहेत,अशी माहिती परीक्षा नियंत्रक शशिकांत ठाकरे यांनी दिली. विद्यापीठाला एकूण १० लाख परीक्षा घ्यायच्या आहेत आणि एका वेळी ३५ हजारावर विद्यार्थी परीक्षेला बसणार, त्यामुळे बँड विड्थ फेल्युअर होऊ नये म्हणून ५ व १० तासाचा स्लॉट ठेवलेला आहे, तसेच क्लाऊड सर्वरचा वापर करण्यात आलेला आहे, त्यामुळे संपूर्ण महाराष्टÑात सुरळीत परीक्षा सुरू आहे.- डॉ. दिनेश भोंडे, कुलसचिव.