अकोला : कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची उपलब्धता अनिवार्य आहे. अशातच जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ऑक्सिजनची आणीबाणी निर्माण झाली आहे.अकोल्यात ऑक्सिजन निर्मितीचे दोन प्लान्ट असून, त्यामार्फत सर्वोपचार रुग्णालयासह खासगी रुग्णालयांना आॅक्सिजन गॅसचा पुरवठा केला जातो; मात्र कोविडच्या प्रादुर्भावामुळे रुग्णसंख्या वाढली असून, आॅक्सिजनची मागणीदेखील वाढली आहे. सर्वोपचार रुग्णालयाला आॅक्सिजन सिलिंडरचा मुबलक पुरवठा होत असला, तरी इतर खासगी रुग्णालयांमध्ये आॅक्सिजन सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांसाठी नागपूर आणि जालना येथून आॅक्सिजन सिलिंडरची मागणी करावी लागत आहे. सोमवारी भुसावळ येथून ५० सिलिंडर मागविण्यात आले तर नागपूर येथून आठवड्यातून एकदाच टँकर येतो. त्यामध्ये केवळ ९५० सिलिंडर भरल्या जातात. या टँकरची आणखी एक मागणी नोंदविली असून, सोमवारी रात्री उशिरापर्यंत टँकर उपलब्ध होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.अशी आहे स्थितीसंस्था - दिवसाला मागणी - पुरवठासर्वोपचार रुग्णालय - ४८० - ४८० (दिवसाला एकदा)खासगी रुग्णालय - ६०० - ९५० (आठवड्यातून एकदा)---------------------