असे भरले जाते टँकमध्ये ऑक्सिजन
टँकर आणि लिक्विड ऑक्सिजन टँक यांच्यात एक होस पाईप लावला जातो. त्यानंतर टँकरमधून टँकमध्ये लिक्विड ऑक्सिजन भरले जाते.
या टँकला एक टॉप सिलिंग वॉल असतो आणि दुसरा बॉटम सिलिंग वॉल असताे. टॉप सिलिंगमधून ऑक्सिजन भरताना टँकचे प्रेशर कमी होते, तर बॉटम सिलिंगमधून भरताना प्रेशर वाढते. त्यामुळे दोघांचा समतोल राखून ऑक्सिजन भरावा लागतो.
टँकमध्ये ऑक्सिजन भरून झाल्यानंतर लिक्विड वेपराईजरपर्यंत पोहोचते. तेथून ऑक्सिजन गॅस तयार होतो. त्यानंतर रेग्युलेटरवर प्रेशर नियंत्रित करून ऑक्सिजन रुग्णांपर्यंत पोहोचतो.
ही चूक बेतू शकते रुग्णाच्या जीवावर
रुग्णालयात काही कोविड वॉर्डामध्ये ऑक्सिजन सिलिंडरद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. अशा पॉईंटवर सिलिंडर ठेवण्यासाठी असलेले ओटे तुटलेले आहेत, तरी काही ठिकाणी हे सिलिंडर जमिनीवरच ठेवण्यात येतात. त्यामुळे काही वेळा सिलिंडरचे संतुलन बिघडल्याने पॉईंटवरील नळ्या तुटण्याचे प्रकार घडले आहेत. याकडे लक्ष न दिल्यास हा प्रकार काही रुग्णांच्या जीवावर बेतणारा ठरू शकतो.
सर्वोपचार रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडरचा मोठा बॅकअप आहे. त्यामुळे टँकमध्ये लिक्विड ऑक्सिजन भरण्यापूर्वी त्यातून रुग्णांना होणारा ऑक्सिजन पुरवठा ऑक्सिजनच्या जम्बो सिलिंडर पाईंटवर वळता केला जातो. त्यानंतरच टँकमध्ये ऑक्सिजन भरण्यात येतो. परिणामी रुग्णांच्या जीवितास कुठलाच धोका उद्भवण्याची शक्यता नाही.
- डॉ. दिनेश नैताम, उपअधीक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला