जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या कठीण काळामध्ये कुठेही ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ नये, या उद्देशाने विशाखापट्टणमवरून नागपूरला आलेल्या ऑक्सिजन एक्स्प्रेसमधील एक टँकर अमरावती आणि अकोला जिल्ह्याला विभागून देण्यात आला. सुमारे १० मेट्रिक टन इतका ऑक्सिजनचा साठा अकोला जिल्ह्याला प्राप्त झाला. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला सहा मेट्रिक टन आणि उर्वरित चार मेट्रिक टन साठा मूर्तिजापूर येथील शासकीय रुग्णालयाला देण्यात आला आहे. या ऑक्सिजन टँकरमुळे जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. गरजू रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी मोठी मदत झाल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सांगितले. तसेच जिल्ह्याची ऑक्सिजनची गरज पाहता पुण्यातून सुद्धा ऑक्सिजनचे टँकर मागविण्यात येत असल्याचेही खडसे यांनी सांगितले.
ऑक्सिजन ट्रेनमुळे मिळाला दहा मेट्रिक टन साठा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 4:23 AM