सचिन राऊत अकाेला : साेशल मीडियाचा वापर ज्या प्रमाणात वाढला त्याचाच आधार घेत सायबर चाेरट्यांनी विविध आमिषे दाखवून अनेकांची रक्कम बँक खात्यातून पळिवल्याच्या घटना घडलेल्या आहेत. अकाेला सायबर पाेलीस स्टेशनच्या माध्यमातून सायबर चाेरट्यांवर नजर ठेवण्यासाठी २४ तास ऑनलाइन गस्त असल्याने बँक खात्यातून पळविलेली सुमारे १५ लाख रुपयांची रक्कम तातडीने परत मिळविली. त्यामुळे सायबर चाेरट्यांवर पाेलिसांची ऑनलाइन गस्त भारी ठरत असल्याचे वास्तव आहे.
सायबर गुन्हेगारी माेठ्या प्रमाणात वाढत असल्याने सायबर चाेरट्यांनी नवे आव्हान पाेलिसांसमाेर उभे केले आहे. मात्र, पाेलिसांनीही एक पाऊल पुढे टाकत सायबर सुरक्षेसाठी पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या सायबर पेट्राेलिंगमुळे सायबर चाेरट्यावरच आता नजर ठेवली आहे. त्यामुळे नागरिकांच्या खात्यातून ऑनलाइन पळविलेली सुमारे १५ लाख रुपयांची रक्कम परत मिळवून दिली आहे. इंटरनेटमुळे बहुतेक व्यवहार ऑनलाइन हाेत आहेत. बँकिंग क्षेत्रातही हे व्यवहार माेठ्या प्रमाणात हाेत असल्याने तसेच ऑनलाइन व्यवहार करताना याेग्य ती काळजी न घेतल्याने फसवणूक झाल्याचे तसेच खात्यातील रक्कम पळविल्याच्या घटना घडलेल्या आहेत. अशा प्रकारच्या तक्रारी सायबर पाेलिसांकडे आल्यानंतर सायबर पाेलिसांनी आतापर्यंत सुमारे १५ लाख रुपयांची रक्कम परत मिळवून दिली आहे.
ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्या
ऑनलाइन बँकिंग तसेच ऑनलाइन पेमेंटचे व्यवहार करताना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन पाेलिसांनी केले आहे. नागरिक हे ऑप्शन वापरताना याेग्य ती खबरदारी घेत नाहीत. याचाच फायदा घेत सायबर चाेरटे ही रक्कम पळविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ऑनलाइन व्यवहार करताना सावधान राहणे गरजेचे असल्याचे आवाहन पाेलिसांनी केले आहे.
संशयास्पद अकाउंटवर वाॅच
साेशल मीडियाचा जास्त वापर करणाऱ्या संशयास्पद अकांउटवर सायबर पाेलिसांचा वाॅच आहे. ज्या अकाउंटवरून जास्त रिक्वेस्ट पाठविण्यात येत आहेत. तसेच आर्थिक व्यवहारसंबंधी पाेस्ट करण्यात येत आहेत, अशांची चाैकशी करण्यात येत असल्याची माहिती आहे.
जातीय तेढ निर्माण करणाऱ्या २३ जणांवर कारवाई
साेशल मीडियावर वादग्रस्त पाेस्ट टाकून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या २३ जणांवर वाॅच ठेवून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या २३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे जातीय तेढ निर्माण करून दंगली घडविण्यांवरही आता वचक निर्माण झाला आहे. सायबर पेट्राेलिंग सायबर चाेरट्यांचे कंबरडे माेडण्यासाठी फायद्याची ठरत आहे.