शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

निर्विघ्न गणेशाेत्सवासाठी पाेलिसांचा ॲक्शन प्लॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 4:23 AM

अकाेला : गणेशाेत्सवासाठी अकाेला पाेलिसांनी ॲक्शन प्लॅन केला असून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे़ यानुसार अकाेला पाेलिसांनी ...

अकाेला : गणेशाेत्सवासाठी अकाेला पाेलिसांनी ॲक्शन प्लॅन केला असून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे़ यानुसार अकाेला पाेलिसांनी आतापर्यंत शांतता समितीच्या ४३ बैठका घेण्यात आल्या असून पाेलीस स्टेशन स्तरावरील पाेलीस मित्र यांच्या तब्बल ५५ बैठका घेऊन हा उत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी तब्बल दाेन हजार पाेलिसांना १० दिवस रस्त्यावरच कडेकाेट बंदाेबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे़ यासाेबतच गावखेड्यात ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम सुरू करण्यात आला असून या उपक्रमात ग्रामस्थांनी माेठ्या प्रमाणात सहभागी हाेण्याचे आवाहन पाेलीस अधीक्षक जी़ श्रीधर यांनी केले आहे़

असा राहणार पाेलीस बंदाेबस्त

१० सप्टेंबर राेजी सुरू हाेणाऱ्या गणेशाेत्सवासाठी जिल्हा पोलीस दलातील १ अपर पोलीस अधीक्षक, २ उपविभागीय पोलीस अधिकारी, २० पोलीस निरीक्षक, ९५ सहायक पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक, १४०० पोलीस कर्मचारी, ५०० होमगार्ड्स तसेच पोलीस मुख्यालयातील ४ आरसीपी प्लाटून, १ क्युआरटी प्लाटून, रिझर्व्ह फोर्स, तसेच राज्य राखीव पोलीस बलाची एक कंपनी असा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे़ हा बंदाेबस्त पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात काम करणार आहे़

८७२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

गणेशोत्सवादरम्यान जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कलम १०७ अन्वये ६४९, कलम १०९ अन्वये ०६, ११० अन्वये ३१ तर कलम ५५, ५६, ५७ अन्वये ०८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे़ कलम १४४ अन्वये १५२ व कलम १४९ अन्वये २६ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. गणेशाेत्सवापूर्वी तब्बल ८७२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर नजर ठेवण्यात येत आहे़

६६ टाेळ्या हद्दपार ३७ जनांवर एमपीडीए

अकाेला पोलीस दलाकडून गुन्हेगारी वृत्तीचे एकूण ३७ इसमांविरुद्ध एमपीडीए ॲक्टअन्वये कारवाई करण्यात आली आहे़ या आराेपींना कारागृहामध्ये स्थानबद्ध करण्यात आले आहे, तर एकूण ६६ गुन्हेगारी टोळ्यांना अकोला जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

दंगा काबू, रुट मार्च

पाेलीस स्टेशन स्तरावर या काळात गस्ती पथक तयार करण्यात आलेली आहे़ या पथकांकडून प्रत्येक गणेश मंडळावर वाॅच राहणार आहे, तर शहरातील विविध भागांत दंगा काबू नियंत्रणाचे प्रात्यक्षिक करण्यात आले आहे़ यासाेबतच शहर पाेलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनात पथसंचलन करण्यात आले आहे़