शहरं
Join us  
Trending Stories
1
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
2
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
3
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
5
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
6
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
7
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
8
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
9
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
10
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
11
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
12
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
13
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

पुलांवरील पथदिवे नादुरुस्तच!

By admin | Published: May 23, 2014 8:40 PM

निमवाडी परिसरातील राष्ट्रीय महामार्गावरील पूल, शहराच्या मध्यभागातील लोखंडी पूल, दगडी पूल तसेच आकोट फैल भागातील रेल्वे पुलावरील पथदिवे सतत नादुरुस्त असल्याची परिस्थिती आहे.

निमवाडी परिसरातील राष्ट्रीय महामार्गावरील पूल, शहराच्या मध्यभागातील लोखंडी पूल, दगडी पूल तसेच आकोट फैल भागातील रेल्वे पुलावरील पथदिव्यांची देखभाल, दुरुस्ती करण्याची जबाबदारी मनपा प्रशासनाकडे आहे. लोखंडी पूल, दगडी पूल वगळल्यास निमवाडी परिसरातील पूल व रेल्वे पुलावरून मोठ्या प्रमाणावर जडवाहतूक होते. तसेच शहरातील नागरिकांची मध्यरात्रीपर्यंत वर्दळ सुरूच असते. तरीसुद्धा या पुलांवरील पथदिवे सतत नादुरुस्त असल्याची परिस्थिती आहे. यासंदर्भात मनपा प्रशासनाला सूचना केल्यानंतर दोन दिवस पथदिवे सुरळीत होतात, त्यानंतर पुन्हा नादुरुस्त होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.** पूल असुरक्षितनिमवाडी भागातील पूल, लोखंडी पूल तसेच दगडी पुलाच्या खाली मृत जनावरे आढळून येतात. लोखंडी पुलाखाली बिनधास्तपणे पत्त्यांचा डाव रंगलेला दिसून येतो. पुलाखाली कचर्‍याचा भराव टाकल्या जात असल्याने नदीला येणार्‍या पुराला अडथळा निर्माण होतो. जलकुंभीमुळे सुद्धा पुराच्या पाण्यास अटकाव होत असल्याने सदर पाणी अनेकदा दगडी पुलावरून निघून जाते. यामुळे दगडी पूल असुरक्षित मानल्या जातो.

** लोखंडी पूल, दगडी पुलाचे कठडे कुचकामीलोखंडी पूल तसेच दगडी पुलावरील कठडे कुचकामी आहेत. लोखंडी पुलावर सिमेंटचे कठडे बांधण्यात आले असून, दगडी पुलावर लोखंडी पाईप बसविण्यात आले आहेत. यापैकी लोखंडी पुलावरील सिमेंटचे कठडे जुने व जीर्ण झाले आहेत. काही कठड्यांना तडे गेले असून, ते कोसळण्याच्या स्थितीत आहेत. मोठ्या लोखंडी पुलावर पादचार्‍यांसाठी फुटपाथची व्यवस्था असल्याने यावरून बच्चे कंपनीसह वयोवृद्ध नागरिक मार्गक्रमण करतात. यामुळे लोखंडी पुलावरील सिमेंटचे कठडे तातडीने दुरुस्त करणे गरजेचे झाले आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत दगडी पुलावर मोठी गर्दी असते. या पुलावरील लोखंडी पाईप अतिशय कुचकामी असल्याचे लक्षात येते. सदर कठडे तत्काळ बदलण्याची आवश्यकता आहे.