खेट्री : पातूर तालुक्यातील चांगेफळ येथे पावसामुळे घर कोसळल्याचा अखेर चौथ्या दिवशी पंचनामा करण्यात आला. मात्र, आर्थिक मदतीची प्रतीक्षा आहे. चांगेफळ येथे नर्बदा दुर्योधन मेंहगे यांचे पावसामुळे मंगळवारी १३ जुलै रोजीच्या मध्यरात्री अचानक घर कोसळल्याची घटना घडली होती; परंतु तीन दिवस उलटूनही पंचनामा करण्यात आला नव्हता. ‘लोकमत’ने १७ जुलै रोजीच्या अंकात वृत्त प्रकाशित करताच संबंधित विभाग खळबळून जागा झाला आणि वृत्त प्रकाशित केल्याच्या दिवशी शनिवार रोजी तहसीलदार यांच्या निर्देशानुसार पंचनामा करण्यात आला आहे.
नर्बदा मेंहगे शेतात मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. त्यामुळे तिची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने घर दगड-मातीचा आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून सतत पावसामुळे दगड मातीच्या भिंतीमध्ये पाणी शिरल्याने घर कोसळल्याची घटना घडली होती. यापूर्वी मागील वर्षीसुद्धा याच महिलेचे घर कोसळले होते. पंचनामाही करण्यात आला होता; परंतु शासनाकडून अद्यापही आर्थिक मदत मिळाली नाही. महिलेने व्याजाने पैसे घेऊन पुन्हा दगड-मातीचे घर बांधले; परंतु यावर्षीही पावसामुळे घर कोसळल्याने महिलेचा संसार पुन्हा उघड्यावर आला आहे. घर कोसळल्यावर तीन दिवस उलटूनही पंचनामा करण्यास दिरंगाई होत असल्याचा प्रकार समोर आला होता; परंतु ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच संबंधित विभाग खळबळून जागा झाला आणि शनिवार रोजी तलाठी यांनी पंचनामा करून अहवाल तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.
(फोटो) बातमीचा
170721\img-20210714-wa0051.jpg
photo