पांडुरंग कवडे यांची संघर्षगाथा ‘मोर्णाकाठचा पांडुरंग’चे प्रकाशन
अकोला : माजी नगराध्यक्ष स्व. पांडुरंग कवडे यांच्या तृतीय स्मृतिदिनाचे औचित्य साधून श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात २७ डिसेंबर रोजी स्व. पांडुरंग कवडे यांची प्रेरणादायी संघर्षगाथा ‘मोर्णाकाठचा पांडुरंग’ या शॉर्ट फिल्मचे प्रकाशन आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. गोवर्धन शर्मा होते. या वेळी महापाैर अर्चना मसने, माजी मंत्री अजहर हुसेन, माजी आ. तुकाराम बिडकर, प्रशांत देशमुख, हरीश आलीमचंदानी, सतीश ढगे, डॉ. किशोर मालोकार, नानुभाई पटेल, महादेव भुईभार, डॉ. रामेश्वर भिसे प्रमुख अतिथी होते. प्रास्ताविक डॉ. सूर्यकांत कवडे यांनी केले. या शॉर्ट फिल्मची निर्मिती डॉ. सूर्यकांत पांडुरंग कवडे यांनी केली. याप्रसंगी समाजसेवक अण्णा हजारे यांनी कार्यक्रमाला दिलेल्या शुभेच्छापत्राचे तसेच केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले. संचालन अक्षय राऊत यांनी तर आभार प्रदर्शन नीलेश कवडे यांनी केले.