अकोला: सर्वोपचार रुग्णालयात विषबाधेसह इतर गंभीर रुग्ण संख्येतही वाढ होत आहे. अत्यावश्यक परिस्थितीत अशा रुग्णांना अतिदक्षता कक्षात हलविण्यात येते; परंतु उपलब्ध खाटांची संख्या अपुरी पडत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरसाठी वेटिंगवर राहावे लागत असल्याचे वास्तव आहे. हा प्रकार रुग्णांसाठी घातक ठरत आहे.गत दीड दोन महिन्यांपासून फवारणीतून विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यातील बहुतांश रुग्णांना अतिदक्षता कक्षात दाखल केले जाते. मागील काही दिवसांत येथे दाखल करण्यात येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे येथे येणाºया नवीन रुग्णांना खाटाच उपलब्ध नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. रुग्णांसाठी खाटांची अंतर्गत व्यवस्था केली, तरी त्यांना व्हेंटिलेटरसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने नातेवाइकांकडून नेहमीच गोंधळ घालण्यात येतो. वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेक रुग्णांना जीव गमवावा लागत असल्याचे वास्तव आहे. अकोल्यात दोन मंत्री असूनही आरोग्य सेवेची ही परिस्थिती चिंताजनक आहे.‘रेफर टू’चा पर्यायअतिदक्षता कक्षात वाढत्या रुग्णसंख्येमुळे जागा उपलब्ध नसल्याने अनेकदा वाद निर्माण होतात. हा वाद टाळण्यासाठी डॉक्टरांकडून नागपूर किंवा इतर खासगी रुग्णालयात रुग्णाला दाखल करण्याचे सांगण्यात येते.व्हेंटिलेशनची संख्या वाढविण्याची गरजसर्वोपचार रुग्णालयातील परिस्थिती पाहता, येथे रिक्त पदांसोबतच उपलब्ध खाटांची कमी मोठी समस्या आहे. शिवाय, अतिदक्षता कक्षात व्हेंटिलेशनची संख्या अपुरी पडत आहे. वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करता व्हेंटिलेशनची संख्या वाढविण्याची गरज आहे.