अकोला : एकीकडे डिजिटल पाऊल टाकत सर्वोपचारमध्ये ‘बारकोड पास’प्रणाली सुरू करण्यात आली आहे; परंतु त्याच सर्वोपचारमध्ये खड्ड्यांमुळे चाळणी झालेल्या रस्त्यावरून खिळखिळ्या स्ट्रेचरवर रुग्णांना एका वॉर्डातून दुसऱ्या वॉर्डात हलविण्यात येत आहे. हा त्रासदायक प्रवास दररोज शेकडो रुग्णांना करावा लागतो; मात्र याकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे दुर्लक्ष होत आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दररोज हजारो रुग्णांवर उपचार केल्या जातो. त्यात बहुतांश रुग्ण अपघातामध्ये गंभीर जखमी झालेले असतात. उपचारानंतर अनेक रुग्णांना एका वॉर्डातून दुसºया वॉर्डात हलविण्यात येते; परंतु त्यासाठी या ठिकाणी उपलब्ध असलेल्या स्ट्रेचरची अवस्था खिळखिळी झाली आहे. शिवाय, सर्वोपचार आवारातील रस्त्यांवर ठिकठिकणी खड्डे पडल्याने या परिसराची चाळणी झाली आहे. अशा परिस्थितीत दररोज शेकडो रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. रुग्णांच्या या व्यथांकडे मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव प्रलंबितसर्वोपचार रुग्णालय परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे; परंतु हा प्रस्ताव लालफीतशाहीत अडकल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.जबाबदारी कोणाची...रुग्णाला एका वॉर्डातून दुसºया वॉर्डात हलविण्यासाठी वॉर्ड बॉयची उपस्थिती अनिवार्य असते; परंतु या ठिकाणी रुग्णाला वॉर्डात नेण्यासाठी किंवा वॉर्डातून हलविण्यासाठी एकही वॉर्ड बॉय उपस्थित नसल्याचे दिसून येते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांनाच स्ट्रेचरच्या साहाय्याने खडतर मार्गातून एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी हलविण्यात येते.मिनी रुग्णवाहिकांचा उपयोग इतर कामांसाठीसर्वोपचार आवारात रुग्णांना एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी हलविण्यासाठी मिनी रुग्णवाहिका उपलब्ध आहेत; परंतु या वाहनांचा उपयोग इतर कामांसाठीच केल्या जात असल्याचे दिसून येते. हा सर्व प्रकार उघडपणे होत असला, तरी त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.