अकोला : सर्वोपचार रुग्णालयात अपघात कक्षातील औषध वितरण कक्ष अनेकदा बंद असते; मात्र शुक्रवारी येथे कर्मचाऱ्यांमधील वादामुळे रुग्णांना औषधांसाठी ताटकळत बसावे लागले. त्यामुळे औषधांसाठी रुग्णांची रांग पोलीस चौकीपर्यंत पोहोचली होती.बाह्यरुग्ण विभागात सकाळी ८ ते २ या कालावधीत नियमित रुग्णसेवा आणि येथेच औषध सुविधाही पुरविण्यात येते; मात्र दुपारी २ वाजतानंतर बाह्यरुग्ण विभाग बंद होत असल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून अपघात कक्षात औषध वितरणाची स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांसह अपघात कक्षात उपचार झालेल्या रुग्णांना याच ठिकाणी रुग्णांना औषधांचे वितरण केले जाते; मात्र अनेकदा हे कक्ष बंद असल्याने रुग्णांना औषधी मिळत नाहीत. शुक्रवारी हे कक्ष सुरू होते; पण येथील एक कर्मचारी अनुपस्थित असल्याने आहे त्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला. काम वाढल्याने कर्मचाºयांमध्ये काही काळ वाद झाल्याने रुग्णांना औषधांसाठी ताटकळत उभे राहावे लागले. पाहता पाहता औषधांसाठी रुग्णांची रांग पोलीस चौकीपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे अपघात कक्षात येणाºया गंभीर रुग्णांना अडचण निर्माण झाली होती.औषधांसाठी रुग्णांना नेहमीच त्रासकर्मचाºयांमधील वादामुळे रुग्णांना औषधांसाठी ताटकळत राहावे लागले; मात्र अपघात कक्षातील औषध वितरण कक्ष अनेकदा बंद राहत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे रुग्णांना नाइलाजास्तव खासगी मेडिकलमधून औषधी खरेदी करावी लागतात. सर्वोपचार रुग्णालयाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका गरीब रुग्णांना सोसावा लागत आहे.