अकोला : जिल्ह्यातील दूध उत्पादकांची देयके रखडल्याने दूध उत्पादक शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यांना तातडीने देयके न मिळाल्यास दूध उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात जिल्हा दूध उत्पादक संघाच्या अंतर्गत प्राथमिक सहकारी दूध संस्था कार्यरत असून, या संस्था दूध महासंघाला दररोज त्याचा पुरवठा करीत आहे. आता तर चिखली येथूनसुद्धा दुधाचा पुरवठा महासंघाला करण्यात येत आहे. वाशिम येथूनही दुधाचा पुरवठा सुरू आहे. दररोज ५ ते ६ हजार लीटर दूध संघामार्फत शासकीय दूध योजना पाठवण्यात येते; परंतु मागील ५४ दिवसांपासून दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे दुधाचे पैसे मिळाले नाहीत. दूध महासंघ शेतकऱ्यांची संस्था असल्याने मागील महिन्यात महासंघाने स्वत:च्या बँक खात्यातील शेतकºयांना १९ लाख रुपयांची रक्कम दिली. हे पैसेदेखील शासनाकडून संघाला मिळाले नाही. त्यामुळे दूध महासंघही आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकºयांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शासनाच्या हक्काचा पैसा द्यावा, अशी मागणी दूध उत्पादक शेतकºयांकडून केली जात आहे. १९ लाख दिले!५४ दिवसांपासून शासनाने दूध उत्पादक शेतकºयांचे पैसे न दिल्याने अकोला जिल्हा सहकारी दूध उत्पादक महासंघाने त्यांच्या खात्यातील १९ लाख रुपये दूध उत्पादक शेतकºयांना दिले आहेत. त्यामुळे दूध उत्पादक महासंघही अडचणीत सापडला आहे. शासनाने दूध उत्पादकांचे तसेच महासंघाचे पैसे तातडीने न दिल्यास महासंघ शेतकरी यांच्यावर मोठी आर्थिक अडचण निर्माण होणार आहे.