गत तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातारण असल्यामुळे भूईमूग उत्पादक शेतकरी चिंतित सापडला होता. पावसाच्या भीतीने काही शेतकऱ्यांची शेंग काढणी झाली, तर काही शेतकऱ्यांद्वारा भूईमूग पिकाची काढणी सुरू आहे. परिसरात मजुरांअभावी पीक शेतातच उभी आहेत. दरम्यान, शनिवारी रात्रीच्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे भूईमुगाच्या शेंगा, कुटार भिजून नुकसान झाले आहे. वादळ वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे मजुरांसह शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. पावसाने भूईमुुगाच्या शेंगा पूर्ण भिजल्याने मातीमिश्रित झाल्या आहेत. पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने शासनाने तातडीने सर्व्हे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.
--------------------------
कवठा, निंबा फाटा परिसरात टीनपत्रे उडाली!
कवठा : कवठा, निंबा फाटा परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास अचानक वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. वादळ वाऱ्यामुळे परिसरातील काही नागरिकांच्या घरावरील टीन पत्रे उडाली होती. पावसाला सुरुवात होताच वीजपुरवठा खंडित झाला होत्या.
------------------------------------
मजुरांची तारांबळ
तेल्हारा तालुक्यातील सौंदळा परिसरात भूईमुगाची काढणी सुरू असून, मजूर शेतात वास्तव्यास आहेत. शनिवारी अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील मजुरांची चांगलीच तारांबळ उडाली होती. वादळ वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे मजुरांच्या झोपडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.