अकोला : सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस अधीक्षक कार्यालयानजीक दोन फुटपाथ विक्रेत्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना शुक्रवारी घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी प्रकाश जाधव, वय ५१ वर्षे हे संचारबंदीचे पालन करण्यासाठी फुटपाथ विक्रेत्यांना वेळेत दुकाने बंद करण्याचे आवाहन करीत होते. तसेच काही मुजोर विक्रेते दुकाने बंद करीत नसल्याने त्यांनी कडक सूचना केल्या. यावेळी संतापलेल्या विक्रेत्यांनी प्रकाश जाधव यांच्यावर हल्ला चढविला. तसेच दगडफेक केली. यामध्ये जखमी झालेल्या जाधव यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची तक्रार सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात केल्याची माहिती आहे.