शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

‘बॉटलनेक’च्या विरोधात नागरिकांनी थोपटले दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 2:47 AM

रस्त्याचे काम बंद; जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: गोरक्षण रोडवरील इन्कम टॅक्स चौकात अरुंद रस्ता निर्माण करून ‘बॉटल नेक’ कायम ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्याचे काम बंद करावे, या मागणीसाठी सोमवारी विविध सामाजिक संघटना व नागरिकांनी दंड थोपटले. महापालिका प्रशासनाने गोरक्षण रोडवर अतिक्रमण करुन बांधण्यात आलेल्या रस्त्याच्या रुंदीकरणाला सुरुवात करण्याची मागणी करीत नागरिकांनी रस्त्याचे काम बंद पाडले. याविषयी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, महापालिका आयुक्त अजय लहाने यांना निवेदन सादर करण्यात आले. शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी आमदार गोवर्धन शर्मा यांनी पाठपुरावा केल्यानंतर शासनाकडून कोट्यवधींचा निधी प्राप्त झाला. या निधीतून नेहरू पार्क ते संत तुकाराम चौकापर्यंत एकूण २ हजार ६३१ मीटर अंतर व १५ मीटर रुंद रस्ता तयार करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केले जात आहे. नेहरू पार्क चौक ते गोरक्षण संस्थानपर्यंत १ हजार ३२० मीटर अंतराच्या रस्ते दुरुस्तीला सुरुवात झाली; मात्र पहिल्याच टप्प्यात महापारेषण कार्यालय ते लक्ष्मी हार्डवेअरपर्यंत ५०० मीटर अंतराच्या इन्कम टॅक्स चौकातील इमारतींमुळे रस्ता रुंदीकरणाला अडथळा निर्माण झाला आहे. परिसरातील अतिक्रमित इमारतींमुळे ५०० मीटर अंतरापर्यंत ‘बॉटल नेक’(निमुळता भाग) तयार होईल. महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार गोरक्षण रस्त्याची रुंदी २४ मीटर असताना तसेच ‘पीडब्ल्यूडी’च्या लेखी हा रस्ता कागदोपत्री १५ मीटर रुंद असल्यावरही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महापारेषण कार्यालय ते इन्कम टॅक्स चौक ते महालक्ष्मी हार्डवेअरपर्यंत केवळ ११ मीटर रुंद रस्त्याचे निर्माण केले जात असल्याचा मुद्दा लोकमत सातत्याने लावून धरला आहे. शनिवारच्या अंकातही या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध करण्यात आले, याची दखल घेत विविध सामाजिक संघटना व नागरिकांनी इन्कम टॅक्स चौकात ११ मीटर रुंद रस्ता तयार केल्यास भविष्यात ‘बॉटलनेक’ कायम राहणार असल्यामुळे सदर काम बंद करण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरले. संबंधित कंत्राटदार व त्यांच्या कर्मचाऱ्यांना काम बंद करण्याचे बजावत नागरिकांनी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, महापालिका आयुक्त अजय लहाने यांना निवेदन सादर केले. याप्रसंगी विनायकराव पवार, गोपी ठाकरे, मनोहरराव हरणे, अनिल माहोरे, अजय गावंडे, पंकज जायले, राधेश्याम शर्मा, बाळू देशमुख, राजेंद्र पातोडे, सचिन शिराळे, अक्षय झटाले, नितेश कर्तक, प्रेमकुमार वानखडे, योगेश थोरात,अमोल शिरसाट आदी उपस्थित होते.मनपा आयुक्तांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा‘बॉटल नेक’च्या मुद्यावर महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी सोमवारी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांची भेट घेतली. रस्ता रुंदीकरणाला अडथळा ठरणाऱ्या इमारती हटविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही अवधी लागेल. यामुळे भविष्यातील अरुंद रस्त्याची समस्या निकाली निघणार असण्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. काम बंद करण्याचे निर्देशइन्कम टॅक्स चौकातील बॉटलनेक दूर केल्यानंतर रस्ता रुंदीकरणाला सुरुवात क रावी तोपर्यंत रस्त्याचे काम बंद करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी ‘पीडब्ल्यूडी’चे कार्यकारी अभियंता मिथीलेश चव्हाण यांना दिले आहेत. इमारती हटविण्याचा मार्ग मोकळामनपाच्या विकास आराखड्यानुसार गोरक्षण रोड २४ मीटर रुंद आहे. महापारेषण कार्यालय ते इन्कम टॅक्स चौक ते महालक्ष्मी हार्डवेअरपर्यंत अरुंद रस्ता आहे. यासंदर्भात नगररचना संचालक, पुणे यांचा अहवाल प्राप्त झाला असून, इमारती हटविण्यास कोणतीही आडकाठी नसल्याचे स्पष्ट झाले आहे.