कुणबी समाज दिनदर्शिका प्रकाशन
अकोला : संत शिराेमणी तुकाराम महाराज कुणबी समाज मंडळाच्या वतीने प्रकाशित दिनदर्शिकेचे प्रकाशन जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्या हस्ते झाले. या वेळी संताेष भाेरे, माया डिवरे. प्रा. प्रवीण ढाेणे, सुभाष दातकर यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी गजानन वाघाेडे, जयंत फाटे आदी उपस्थित हाेते.
मानव सेवा फाउंडेशनच्या वतीने अन्नदान
अकाेला : मानव सेवा फाउंडेशन व सार्वजनिक सेवा मंडळ, अकोलाद्वारे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चाैथ्या शनिवारी अन्नदान केले जाते. त्याच अनुषंगाने ९ जानेवारी राेजी जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालय येथे अन्नदान करण्यात आले. अन्नदाते वसंतराव खोलकुटे होते. लेडी हार्डींग येथील गरजवंतांसाठी जिलेबी व पुलावासाठी लागणाऱ्या संपूर्ण खर्चाचा भार खोलकुटे यांनी उचलला. याप्रसंगी राजेश भाऊ धनगावकर, विवेक सातपुते, राहुल खंडाळकर, पूनम खंडाळकर, रवींद्र भाऊ पोकळे, वसंतराव खोलकुटे, डॉ. सचितानंद गोसावी, विवेक सातपुते आदी उपस्थित हाेते.
ग्राहक मंचच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंती
अकोला : अखिल भारतीय ग्राहक मंचाच्या वतीने १२ जानेवारी राेजी स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त लहाने सभागृहात कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख विजय केंदरकर यांनी दिली. कार्यक्रम काेराेना नियमांचे पालन करून केला जाणार आहे.
आधार प्रमाणीकरण तातडीने करा
अकोला : महात्मा जोतीराव फुले योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ८ जानेवारी अखेर ४,१३५ खातेदारांचे आधार प्रमाणीकरण झालेले नाही. अशा पात्र लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण तातडीने करण्याचे आवाहन साहाय्यक निबंधक एस. डब्ल्यू. खाडे यांनी केले आहे.
‘निसर्गोपचार घरोघरी’ सर्वोदय मंडळाचा उपक्रम
अकोला : आपल्या अवतीभोवती उपलब्ध होणारी निसर्गोपचार चिकित्सा घरोघरी नेण्यासाठी वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज निसर्गोपचार संस्थेच्या वतीने प्रशिक्षण कार्यक्रम राबविणार असल्याची माहिती संस्थाध्यक्ष गोवर्धनदादा खवले यांनी दिली. अकोला जिल्हा सर्वोदय मंडळाच्या मासिक सभेत ते बोलत होते. सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव कानकिरड यांच्या अध्यक्षतेत व ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते महादेवराव भुईभार, वसंतराव केदार, वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज निसर्गोपचार संस्थेचे सचिव डाॅ. काशिनाथ दाते यांची प्रमुख उपस्थिती होती.
मकरसंक्रांतीनिमित्त तुलादानचे आयाेजन
अकोला : श्री पुंडलिक बाबा गाेरक्षण संस्थानतर्फे मकरसंक्रांती उत्सवानिमित्त तुलादान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मूर्तिजापूर गाेरक्षण संस्थान प्रांगणात हा कार्यक्रम होणार आहे. संजय महाराज पाचपोर यांच्या उपस्थितीत तुलादान हाेणार आहे.
राष्ट्रीय किसान मोर्चाचे आंदोलन
अकोला : जनविरोधी काळे कायदे रद्द करण्यासाठी सुरू असलेल्या संयुक्त कास्तकार आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने देशव्यापी सर्व जिल्ह्यात सात दिवसीय आंदोलन आयोजित केले आहे.