ठळक मुद्देकोल्हापूर बंधार्यात गेट टाकुन अडवले पाणीतालुक्यात पडला केवळ ४00 मि.मी. पाऊस
लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला : पातुर तालुक्यातील भंडारज बु.च्या युवकांनी शासनाची वाट न पाहता सुवर्ण नदीतील वाहुन जाणारे पावसाचे १0९ टीसीएम पाणी स्वत: कोल्हापूर बंधार्यात गेट टाकुन अडवले.
सध्या तालुक्यात केवळ ४00 मि.मी. पाऊस पडल्याने प्रत्येक गावात पाण्याची टंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गतवर्षी जलयुक्त शिवार योजने तून बंधारा दुरूस्त करण्यात आला होता. तीन दिवसांपूर्वी पर तीच्या पावसाने दमदार हजेरी लावली होती, त्यामुळे सुवर्ण नदीला पहिल्यांदा पाणी आले होते. भंडारज बु. येथील दीपक इंगळे, संदीप इंगळे, राजेंद्र सुरवाडे, सुनील इंगळे, राजकुमार इंगळे, सुनील सुरवाडे, शेषराव सुरवाडे, रामेश्वर वसतकार, संदेश इंगळे, अमर बोरकर, रत्नदीप सुरवाडे, निशांत इंगळे, पंकज सुरवाडे, आनंद सुरवाडे, श्रीकृष्ण इंगळे, शेषराव निखाडे, सुनील शिरसाट, रोहन इंगळे, सचिन वानखडे, भुषण इंगळे, अजय इंगळे, संतोष भांगे, शुभम ग्रहांचे आदींनी शासकीय यंत्रणेची वाट न पाहता सुवर्ण नदीवरील भंडारज बु. येथील कोल्हापूरी बंधार्यावर गेट टाकले. त्यामुळे १0९ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे. दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे पातुर तहसीलदार डॉ. आर.जी. पुरी यांनी अभिनंदन केले.