माेबाइल हरविल्याच्या तक्रारी
वर्ष हरविले परत मिळाले
२०१९ ७६४ ४८९
२०२० ५४३ ४९५
२०२१ १६५ १०५
जानेवारी ३८ २४
फेब्रुवारी २९ १८
मार्च १९ ११
एप्रिल २२ १४
मे २६ १७
जून ३१ २१
या ठिकाणी सांभाळा माेबाइल
शहरातील जनता भाजी बाजार, टिळक राेड, गांधी चाैक, जयहिंद चाैक, जैन मंदिर परिसर, काेठडी बाजार, मध्यवर्ती बसस्थानक, जुने बसस्थानक, टाॅवर चाैक परिसर यासह आकाेट शहर, मूर्तिजापूर, पातूर व बाळापूर शहरातील काही भागातून माेबाइल चाेरी हाेत असल्याच्या तसेच हरिवल्या जात असल्याच्या तक्रारी जास्त आहेत़ त्यामुळे या ठिकाणी जाताना माेबाइल सांभाळण्याचे आवाहन पाेलिसांनी केले आहे़
५० टक्के माेबाइलचा तपासच लागत नाही
माेबाइल चाेरी गेल्यानंतर किंवा हरवल्यानंतर पाेलिसात तक्रार देण्यात येते. पाेलीसही तातडीने माेबाइलचा शाेध घेण्यासाठी सायबर सेलला कळवितात़ मात्र माेबाइल स्वीच ऑफ झाल्यानंतर त्याचा शाेध लागणे कठीण आहे. आता बहुतांश माेेबाइल हरविल्यानंतर ते बरेच वर्ष बंद ठेवत असल्याने अशा माेबाइलचा शाेध लावणे पाेलिसांनाही आव्हानात्मक आहे़ त्यामुळे बऱ्याच प्रकरणात माेबाइलचा तपास लागत नसल्याची माहिती आहे़
माेबाइल चाेरी जाताच हे करा
माेबाइल चाेरी गेल्यानंतर तातडीने पाेलीस तक्रार करा, त्यानंतर ऑनलाइन बॅंकिंग किंवा फाेन पे, गुगल पे चा वापर करीत असाल तर त्या सर्वांना हेल्पलाइन क्रमांकावर माहिती देऊन तुमचे खाते बंद करा़ ज्या कंपनीचे सीमकार्ड आहे त्यांना काॅल करून सीमकार्ड काही वेळेसाठी बंद करायला सांगा़ त्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान हाेणार नाही़
बाजारपेठेत जाताना तसेच काेणत्याही दुकानात खरेदी करीत असताना अनेक जण त्यांचा माेबाइल खिशातून बाहेर काढून ठेवतात़ काम झाल्यानंतर माेबाइल तेथेच विसरून परत जातात. तेवढ्यात ताे माेबाइल दुसराच व्यक्ती घेऊन जाताे़ त्यामुळे प्रत्येकाने माेबाइल बाहेर काढण्याची सवय बंद करावी़ तसेच गर्दीच्या ठिकाणी जाताना काळजी घ्यावी़
सचिन कदम
शहर पाेलीस उपअधीक्षक, अकाेला