महागाईच्या विरोधातील काँग्रेसच्या अभियानात जनतेने सहभागी व्हावे - दिलीप सरनाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 12:31 PM2021-11-25T12:31:17+5:302021-11-25T12:31:29+5:30
Akola News : अभियानात जनतेने स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा प्रभारी ॲड.दिलीप सरनाईक यांनी केले आहे.
अकोला- केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे संपुर्ण देशात महागाईने उच्चांक गाठला असून त्यामुळे सर्व सामान्य जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. फक्त पेट्रोल आणि डिझेलचे नव्हे तर प्रत्येक जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. महागाईच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात संपूर्ण राज्यात जनजागरण अभियानाला 14 नोव्हेंबर पासून सुरुवात झाली असून त्याच अनुषंगाने अकोला जिल्ह्यात जिल्ह्याचे अध्यक्ष अशोक अमानकर व जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते , तालुका अध्यक्ष, अभियानचे समन्वयक व प्रमुख पदाधिकारी गावागावात जाऊन जनजागृती करीत आहेत.या अभियानात जनतेने स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा प्रभारी ॲड.दिलीप सरनाईक यांनी केले आहे.
सदर अभियान मध्ये काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी गावागावात जाऊन बैठकी घेऊन लोकांना केंद्र सरकारच्या नाकर्तेपणा समजाऊन सांगत आहेत. अभियान अंतर्गत काँग्रेस नेते गावातील स्वातंत्र्य सैनिकांच्या घरी भेटी देऊन तसेच कोरोना काळात ज्यांचा मृत्यू झाला अश्या परिवाराचे सांत्वन करीत आहेत. ग्रामीण भागात रात्रीचा मुक्काम करून सकाळी गावात प्रभात फेरी काढणे असा कार्यक्रम काँग्रेस नेते राबवित आहेत. या अभियानाला ग्रामीण भागात प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत जिल्ह्यातील जवळपास 100 गावात हे अभियान पोहचले आहे.29 तारखे पर्यंत चालणाऱ्या या अभियानात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून व्यापक स्वरूपात हे अभियान राबवावे असे आवाहन जिल्हा प्रभारी ॲड. दिलीप सरनाईक व सह प्रभारी नंदकिशोर कुईटे यांनी केले आहे.