शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
3
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
5
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
6
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
7
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
8
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
9
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
10
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
11
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
12
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
13
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
14
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
15
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
16
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
17
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
18
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
19
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
20
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी

कीटकनाशक फवारणीमुळे शेतकर्‍यांचा मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 1:45 AM

अकोला : पिकांवर कीटकनाशकांची फवारणी केल्याने शेतकरी, शेतमजुराचा मृत्यू झाला आहे. या घटनेने शेतकर्‍यांमध्ये प्रचंड धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे कृषी विभाग, तज्ज्ञ, खळबळून जागे झाले असून, कीटकनाशकांची फवारणी करताना तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देउंच पिकात फवारणी करताना काळजी घेण्याचे कृषी तज्ज्ञांचे आवाहनपिकांवर कीटकनाशकांची फवारणी केल्याने शेतकरी, शेतमजुराचा मृत्यूकृषी विभाग, तज्ज्ञ, झाले खळबळून जागे 

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पिकांवर कीटकनाशकांची फवारणी केल्याने शेतकरी, शेतमजुराचा मृत्यू झाला आहे. या घटनेने शेतकर्‍यांमध्ये प्रचंड धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे कृषी विभाग, तज्ज्ञ, खळबळून जागे झाले असून, कीटकनाशकांची फवारणी करताना तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.विदर्भातील यवतमाळ व अकोला जिल्हय़ात शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाली आहे. सध्या पश्‍चिम विदर्भात दमट, उष्ण व प्रखर ऊन अशाप्रकारचे वातावरण आहे. बहुतांश शेतकर्‍यांनी कपाशीची लागवड ओळीने केली आहे. काही भागात कपाशीच्या सर्वसाधारण वाढीपेक्षा १ ते १.५ फूट जास्तीची वाढ (४.५ ते ६ फूट) झाली आहे. त्यामुळे ही कपाशी दाटली असून, पिकात सहज शिरता येत नाही. कपाशीच्या शेतात खेळती हवा येत नसल्याने  पिकामधील सूक्ष्म वातावरण रसशोषक व बोंडअळ्यांना पोषक ठरत आहे.दरम्यान, किडींचा प्रादुर्भाव नष्ट करण्यासाठी शेतकर्‍यांनी शिफारस केलेली कीटकनाशके नामांकित कंपनीकडून खरेदी करावे, कीटकनाशके कुलूपबंद पेटीत ठेवावी, कीटकनाशके लहान मुलांपासून दूर ठेवावीत, माहितीपत्रक वाचून खबरदारी घ्यावी, तणनाशकांचा पंप कीटकनाशक फवारणीसाठी वापरू  नये, कीटकनाशकांची मात्रा मोजून घ्यावी.पद्धतीने दाट व उंच कपाशीच्या पिकात फवारणी करणे आवश्यक असल्यास एकेरी नोझल असलेल्या फवारणी पंपाचा वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे फवारणीचा घेर कमी होऊन द्रावणाचा तुषार रू पाने फवारणी करणार्‍यांशी संपर्क कमी येतो. दाट पिकात चालण्याचा वेग कमी होतो, दाटलेल्या पिकात मोकळा श्‍वास घेता येत नाही, सध्याच्या वातावरणात तासन्तास फवारणी केल्यामुळे घाम येतो, कीटकनाशकाचे द्रावण सहज फवारणी करता येत नाही, फवारणी यंत्राची दांडी सहज खाली-वर फिरवता येत नाही, फवारा कंबरेच्यावर व चेहर्‍याच्या पातळीवर करतानाचे शास्त्रज्ञांच्या चमूला आढळून आले आहे. अशा पद्धतीने केलेल्या फवारणीमुळे द्रावण, अंगावर, डोळ्यात व श्‍वासाद्वारे नाकात जाते. डोळ्यांनी अंधुक दिसते व चक्कर येणे अशी लक्षणे दिसत आहेत. म्हणूनच फवारणी पंपाचा वापर करणे गरजेचे असल्याचा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभाग व कृषी अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने शेतकर्‍यांना दिला आहे. पीक हंगामात दीर्घकाळ कीटकनाशकांची फवारणी केल्यास ती व्यक्ती कीटकनाशकांच्या संपर्कात येते. हे टाळण्यासाठी दक्षता घेणे गरजेचे आहे. दाटलेल्या पिकांमध्ये शेतमजूर दिवसभर फवारणी करीत असल्याचे चमूला आढळून आले आहे. अशा व्यक्तीमध्ये त्वचेची अँलर्जी, खाज, सतत डोकेदुखी, अशक्तपणा, मळमळ, चक्कर येणे, दृष्टी कमी होणे, हेही लक्षणे दिसू शकतात.किटकनाशक वापरताना   प्लास्टिक बकेटमध्ये कीटकनाशकांची आवश्यक मात्रा पाण्यामध्ये घेऊन काठीने एकजीव मिश्रण करावे, आवश्यक क्षेत्रासाठी पाण्यात मिसळून फवारणीचे द्रावण तयार करावे, फवारणी पंपातून सर्वसाधारण मध्यम आकाराचे (१00 ते ३00 मायक्रॉन) थेंब पडतात म्हणून मध्यम आकाराचे थेंब फवारणीसाठी योग्य आहेत. यापेक्षा लहान आकाराचे थेंब फवारल्यास पिकावर योग्य त्या ठिकाणी पडण्यापूर्वी ते वार्‍याने इतरत्र जाण्याची शक्यता असते. फवारणी करताना संरक्षक कपडे, बुट, हातमोजे, नाकावरील मास्क इत्यादीचा वापर करावा, फवारणी हवेच्या दिशेने सकाळी किंवा संध्याकाळी करावी, पंपाच्या नोझलमधील कचारा तोंडाने फुकून काढू नये, कीटकनाशकाचा शरीराशी सरळ संपर्क आल्यास पाण्याने स्वच्छ धुवावे, फवारणीच्यावेळी खाद्यपदार्थ किंवा पिण्याचे पाणी ठेवू नये, खाद्यपदार्थ, तंबाखू किंवा बीडी ओढण्यापूर्वी तोंड, हात, पाय स्वच्छ धुवावेत, फवारणीनंतर अंघोळ करावी व कपडे स्वच्छ धुवावेत, कीटकनाशक फवारलेल्या शेतामध्ये ‘इशारा फलक’ लावावे.

बाधित व्यक्तीने कोणती काळजी घ्यावी?कीटकनाशकांची पोटातून, त्वचा, डोळे, श्‍वसन इंद्रिये इत्यादीद्वारे विषबाधा होऊ शकते.विषबाधा झालेल्या व्यक्तीस अपघात स्थळापासून दूर न्यावे, त्याच्या अंगावरील कपडे बदलावे, बाधित भागात ताबडतोब साबणाने स्वच्छ धुऊन, कपडा, टॉवलने पुसावे, कीटकनाशक पोटात गेलेले असल्यास बाधित व्यक्तीस ताबडतोब ओकारी करण्याची उपाययोजना करावी, रोग्याला पिण्यासाठी दूध तसेच विडी, सिगारेट, तंबाखू देऊ नये, घाम येत असल्यास टॉवेलने पुसावे, थंडी वाजल्यास अंगावर पांघरू ण घालावे, श्‍वासोच्छवास योग्य रीतीने सुरू  आहे का, ते बघावे, श्‍वासोच्छवास अनियमित किंवा बंद झाल्यास त्वरित त्याच्या तोंडाला तोंड लावून कृत्रिम श्‍वासोच्छवास सुरू  करावा, झटके येत असल्यास त्याच्या दातामध्ये मऊ कापडाची छोटी गुंडाळी टाकावी, बेशुद्ध पडल्यास शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न करावे, तसेच त्याला त्वरित कीटकनाशकांच्या माहितीपत्रकासह डॉक्टरांना दाखवून त्यांच्या निगराणीत उपचार सुरू  करावे, रोगी बरा झाल्यावर त्याची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करावी.

सर्वात विषारी कीटकनाशक कोणते?डब्यावरील लाल रंगाचे पतंगीच्या आकाराचे चिन्हे असलेली कीटक नाशके सर्वात विषारी आहे. त्यानंतर पिवळा, निळा व हिरवा असा क्रम लागतो. ही चिन्हे सोपी व सर्वसाधारण, निरक्षर व्यक्तींना समजण्यासाठी असतात. हिरव्या रंगाचे चिन्हे असलेली कीटकनाशके कमीत कमी विषारी असतात, फारच आवश्यकता असल्यास डब्यावर लाल रंगाचे चिन्हे असलेली कीटकनाशके वापरावी, अशी कीटकनाशके पर्यावरण, मानव, जीवजंतूंना तुलनेने जास्त हानिकारक असतात.

कीटकनाशकामुळे अकोला व यवतमाळ जिल्हय़ात शेतमजुरांना विषबाधा झाली आहे. शेतकरी, शेतमजुरांनी फवारणीसाठी या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास विषबाधा टाळता येईल. कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार हे करावे.डॉ. धनराज उंदिरवाडे,विभाग प्रमुख, कीटकशास्त्र,डॉ. पंदेकृवि, अकोला.