गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलची दरवाढ वरचेवर होत आहे. दोन महिन्यांमध्ये २० वेळा पेट्रोल दरवाढ झाली आहे. पेट्रोल दरवाढ होत असल्याने पेट्रोल लीटरमागे शंभरी गाठणार असे वाटत असल्याने सर्वसामान्य वाहनधारकांचे बजेट कोलमडले आहेत. गेल्या वर्षी पेट्रोलचा दर ८० रुपयांच्या आसपास होता. मात्र २०२० च्या डिसेंबरपासून पेट्रोलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. शेतकरी पारंपरिक शेतीकडून आधुनिक शेतीकडे वळला आहे. बैलजोडीने होणारी मशागत व इतर कामे ट्रॅक्टरद्वारे व इतर कृषी यंत्राद्वारे केली जात आहेत. त्यामुळे पेट्रोल, डिझेल दरवाढीचा फटका आता शेती उद्योगालाही बसणार असल्याने शेती उद्योग अगोदरच संकटात असताना त्या संकटात मात्र अजून भर पडणार आहे. आता काही दिवसात शेतीच्या मशागतीचे कामे सुरू होणार असून डिझेल दरवाढीमुळे शेतकरी वर्ग चिंतित झाला आहे. अगोदरच नैसर्गिक संकटाने शेतकरी वारंवार संकटात सापडत आहे. यातच डिझेलच्या दरवाढीने शेतीवरही संक्रांत आली आहे. असे मत शेतकरी महेश वारकरी यांनी मांडले. शिक्षक अनंत साकरकर यांनी, दुचाकीशिवाय नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी जाणे-येणे होत नाही. आता पेट्रोलच्या दरात वरचेवर वाढ होत असल्याने आर्थिक बजेटही कोलमडत असल्याचे मत व्यक्त केले.
पेट्रोल-डिझेल दरवाढीचा शेती उद्योगाला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 4:17 AM