अकोला: पेट्रोल व डिझेलची दरवाढ, तसेच रेल्वेची भाडेवाढ या केंद्र सरकारच्या अलिकडच्या काळातील निर्णयाचा जाहीर निषेध करण्यासाठी काँग्रेसच्यावतीने रविवार, ६ जुलै रोजी जिल्हय़ात अनेक ठिकाणी निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी मोटारसायकली व ट्रॅक्टर आदी वाहने लोटत नेऊन प्रतिकात्मक निषेध केला. बाश्रीटाकळी : केंद्र शासनाने नुकत्याच केलेल्या रेल्वे भाडेवाढ व पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेधार्थ बाश्रीटाकळी तालुका काँग्रेस कमिटीने रविवार, ६ जुलै रोजी बाश्रीटाकळी येथे भव्य निषेध मोर्चा काढला. काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी दुपारी १ वाजता स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधून तहसील कार्यालयापर्यंत मोटारसायकल, ट्रॅक्टर आदी वाहने लोटत नेऊन मोर्चा काढला. केंद्रातील भाजप सरकारने सत्तेवर येताच घेतलेल्या पेट्राल, डिझेल दरवाढ व रेल्वेची भाडेवाढ करण्याच्या निर्णयाविरुद्ध घोषणाबाजी करत हा मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत गेला. तेथे काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी तहसीलदार सुनील पाटील यांना निवेदन सादर केले. अकोला जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाबाराव विखे पाटील, तालुकाध्यक्ष अ. सत्तार, बाश्रीटाकळी काँग्रेसचे अध्यक्ष बाळूभाऊ ढोरे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मोर्चात सादिक शेख, भारत बोबडे, डॉ. मनोहर दांदळे, माजी जि. प. सदस्य आलमगीर खान, पंचायत समिती उपसभापती सै. फारुख, शे. अजहर, जाकीर हुसेन, मुन्ना पठाण, लक्ष्मणराव नंदापुरे, नाना नंदापुरे, साहेबराव जाधव, नसिमोद्दीन अजिमोद्दीन, तालुका सेवादल अध्यक्ष नागोराव सरप, अनिस इकबाल, छोटूभाई, अ. मतीन अहमद, कालुभाई, शे. जमीर, तुकाराम जाधव, मांगीलाल पवार, आनंद मानकर, मोहसिन खान, आसीफ खान, माजी सरपंच देवराव आडोळे, गजानन आखरे, सुनील देशमुख, सुनील चव्हाण, गोपाल देवकर, बंसीलाल भांगे, सुरेश भगत, रवींद्र राठोड, रमेश बेटकर, सदानंद मते, सतीश गाढवे, विजय वडजे, बाळू राठोड, तनवीर अहमद यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आकोट: देशातील महागाई कमी करून ह्यअच्छे दिनह्ण आणण्याचे आश्वासन देणार्या कें द्र सरकारने डिझेल, पेट्रोल, रेल्वे भाड्यात वाढ केल्याच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेसच्यावतीने शहरात बंद वाहने रस्त्यावर लोटत नेण्याचे अभिनव आंदोलन करण्यात आले. अक ोला जिल्हा काँग्रेस अध्यक्ष हिदायत पटेल, आकोट तालुकाध्यक्ष तुळशीराम इस्तापे तथा आकोट शहर अध्यक्ष रतन गुजर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शिवाजी चौक ते सोनू चौकदरम्यानच्या मार्गावर बंद केलेली वाहने लोटत नेण्यात आली. यामध्ये दुचाकी, ट्रॅक्टर, बैलबंडी आदी बंद वाहनांचा समावेश होता. पेट्रोल, डिझेल दरवाढ केल्याबद्दल,तसेच महागाईवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याबद्दल केंद्र शासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजीही करण्यात आली. बद्रुज्जुमा, डॉ. पुरुषोत्तम दातकर, मनोज खंडारे, डॉ. प्रमोद चोरे, संजय बोडखे, संजय बरेठिया, सतीश हाडोळे, दीपक वर्मा, अतुल सोनखासकर, प्रशांत पाचडे, डॉ. अक्र म, जुनेद बेग, राजेश भालतिलक, आनंद अग्रवाल, सुनील गावंडे, चंद्रशेखर बारब्दे, प्रतीक गोरे, मनोज खंडारे, विकास देशमुख, रवी ठाकूर, चंदू चापके, नागेश इंगळे, मुकुंद पांडे, सारंग मालाणी म. आरिफ, शे. ख्वाजा, कालुभाई, गुलाम आरिफ, अ. वहिद आदींसह शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. मूर्तिजापूर : केंद्रातील भाजप सरकारने घेतलेल्या पेट्रोल, डिझेल व रेल्वेच्या भाडेवाढीच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी मूर्तिजापूर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने रविवार, ६ जुलै रोजी मोर्चा काढण्यात आला. येथील शिवाजी चौकातून सुरू झालेल्या या मोर्चात शेकडो काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोटारसायकल, ट्रॅक्टर आदी वाहने लोटत नेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांना पेट्रोल, डिझेल दरवाढीचा प्रतीकात्मक निषेध केला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्रातील भाजप सरकाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या मोर्चात काँग्रेस शहर अध्यक्ष धीरज अग्रवाल, तालुकाध्यक्ष गणेशराव महल्ले, नगरसेवक भारत जेठवाणी, उपाध्यक्ष तौसीफ खान, जिल्हा संघटक अशोक दुबे, महिला सेलच्या शहर अध्यक्ष दुर्गाताई मोहिते, रोहित सोळंके, सुनील वानखडे, जयप्रकाश रावत, अ. कुद्दुस, तस्लीम खान, अतुल मुळे, प्रशांत तिवारी, मो. शारिक, अविनाश गोंधळेकर, विशाल गिरी, पप्पू मुळे, दीपक तायडे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. पातूर : पातूर तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने रविवार, ७ जुलै रोजी रेल्वे भाडेवाढ, पेट्रोल, डिझेल व अन्य जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ करण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला. यावेळी काँग्रसेच्या शेकडो कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी जुन्या बसस्टँड चौकातून शहर काँग्रेस कार्यालयापर्यंत मोटारसायकली लोटत नेऊन केंद्र शासनाच्या निर्णयाचा निषेध केला. ह्यअच्छे दिन चले गये, बुरे दिन आ गयेह्ण अशा घोषणाबाजी करत शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांची ही रॅली शहर काँग्रेस कार्यालयापर्यंत गेली. तेथे या रॅलीचा समारोप झाला. या रॅलीमध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव प्रकाश तायडे, तालुकाध्यक्ष समाधान राठोड, शहर काँग्रेस अध्यक्ष सै. शमी, माजी सभापती बबनराव देवकर, सेवादल शहर अध्यक्ष मुख्तार सर, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष अलीमुद्दीन बाबर, आत्मा समितीचे सदस्य शेख सलीम, युवक काँग्रेस अध्यक्ष अनिल पटेल, अल्पसंख्याक सेलचे माजी अध्यक्ष बब्बुभाई, श्यामसिंग चव्हाण, अनिल राठोड, बाबूसिंग राठोड, हरिश्चंद्र जाधव, कोंडूजी इंगळे, मधुकरराव पवार, मधुकर जाधव, सुभाष पजई, शेख राजीक, शेख कालू, श्रीकृष्ण भुमरे, दादाराव हातोले, मो. अजहर शेख गफ्फार, अय्युब खान, मो. इसरार खान, सै. अजहर सै. मुशर्रफ, बाळासाहेब काळे, संजय बारनाले यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठय़ा संख्येन उपस्थित होते.
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध
By admin | Published: July 07, 2014 12:37 AM