लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील एका नामी पेट्रोल पंप संचालकांच्या विरोधात तब्बल २२ कर्मचार्यांनी कामगार आयुक्तांच्या न्यायालयात तक्रार केली होती; मात्र पेट्रोल पंप संचालकांनी तक्रार करणार्या कर्मचार्यांना दबावात घेतल्याने अनेकांनी माघार घेतली. दरम्यान, कामगार आयुक्तांनी दिलेल्या तारखांवर हजर न राहता पेट्रोल पंप चालकाने ठेंगा दाखविला आहे. त्यामुळे आता न्याय मागण्यासाठी या कर्मचार्यांना न्यायालयाशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही.शहरातील एका नामी पेट्रोल पंपावर कार्यरत असलेल्या कर्मचार्यांनी सहायक कामगार आयुक्तांकडे तक्रार केली होती. अनेक वर्षांपासून कार्यरत असतानाही भविष्य निर्वाह निधी कपा त केला जात नाही. कामगारांसाठी असलेल्या कोणत्याही सेवा-सुविधा दिल्या जात नाही. या तक्रारीची गंभीर दखल घेत कामगार आयुक्त कार्यालयाने विवादात सापडलेल्या या पेट्रोल पंप संचालकास नोटीस पाठवून याप्रकरणी स्पष्टीकरण सादर करण्यास सांगितले. दरम्यान, सुरुवातीला येऊन पेट्रोल पंप संचालकाने बाजू ठेवली. तक्रार करणार्यांपैकी सात जण शेवटच्या तारखेपर्यंत टिकले. यातील पाच जणांनी संशयास्पद माघार घेतली. पाच जणांना तक्रार मागे घेण्यासाठी पेट्रोल पंप संचालकांनी रक्कम दिल्याचे काहींचे म्हणणे आहे. दरम्यान, कामगार आयुक्तांकडील तक्रारीतील हवा निघून गेल्याने पेट्रोल पंप संचालकांनी तारखेवरही येणे सोडले आहे. आता पेट्रोल पंपावरील कर्मचार्यांनी न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे.
पेट्रोल पंप संचालकांनी कामगार आयुक्तांना दाखविला ठेंगा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 1:02 AM
अकोला : शहरातील एका नामी पेट्रोल पंप संचालकांच्या विरोधात तब्बल २२ कर्मचार्यांनी कामगार आयुक्तांच्या न्यायालयात तक्रार केली होती; मात्र पेट्रोल पंप संचालकांनी तक्रार करणार्या कर्मचार्यांना दबावात घेतल्याने अनेकांनी माघार घेतली.
ठळक मुद्देएका नामी पेट्रोल पंप संचालकांच्या विरोधात तक्रार कामगार आयुक्तांच्या न्यायालयात २२ कर्मचार्यांनी केली होती तक्रार तक्रार करणार्या कर्मचार्यांना दबावात घेतल्याने अनेकांनी घेतली माघार तारखांवर हजर न राहता पेट्रोल पंप चालकाने दाखविला ठेंगा