अकोला : प्राथमिक आरोग्य सुधारणा साहाय्यता कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची (पीएचसी) तपासणी शुक्रवार, ११ आॅक्टोबरपासून सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्हास्तरीय पथकामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सेवा-सुविधा आणि नोंदीविषयक कामाचा लेखाजोखा घेण्यात येत आहे.जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका यांचा समावेश असलेल्या जिल्हास्तरीय पथकामार्फत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. या तपासणीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा-सुविधा तसेच राबविण्यात येणाºया आरोग्यविषयक योजना आणि कामकाजाच्या नोंदीची माहिती जिल्हास्तरीय पथकामार्फत घेण्यात येत आहे.पहिल्या दिवशी पाच ‘पीएचसीं’ची तपासणी!जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या तपासणीत पहिल्या दिवशी (शुक्रवारी) जिल्ह्यातील पातूर तालुक्यात पातूर, कापशी, आलेगाव, बाभूळगाव व मळसूर इत्यादी पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांची तपासणी जिल्हास्तरीय पथकामार्फत करण्यात आली. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, डॉ. विजय जाधव, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल यांनी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रांची तपासणी केली.