- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: प्राधान्य गट आणि अंत्योदय अन्न योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थीप्रमाणे केशरी (एपीएल) शिधापत्रिकाधारक लाभार्थींनाही २ रुपये किलो गहू व ३ रुपये किलो तांदळाचे वितरण अपेक्षित असल्याने, जिल्ह्यात ८ रुपये किलो गहू व १२ रुपये किलो तांदूळ या सवलतीच्या दरातील धान्याची उचल केशरी शिधापत्रिकाधारकांकडून होत नसल्याचे वास्तव मंगळवारी समोर आले आहे.‘लॉकडाउन’च्या पृष्ठभूमीवर प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थी कुटुंबांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत दरमहा प्रति लाभार्थीला पाच किलो मोफत तांदळाचे वाटप करण्यात येत आहे. ‘लॉकडाउन’च्या पृष्ठभूमीवर प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थीव्यतिरिक्त ज्यांना रास्त भाव दुकानांमधून दरमहा धान्य मिळत नाही, अशा केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थींना मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीत शासनामार्फत सवलतीच्या दरात ८ रुपये किलो गहू व १२ रुपये किलो तांदळाचे वितरण रास्त भाव दुकानांमधून सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थीं कुटुंबातील प्रत्येक सदस्याला दरमहा सवलतीच्या दरात ३ किलो गहू व २ किलो तांदळाचे वितरण करण्यात येत आहे. जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारकांना गत २४ एप्रिलपासून रास्त भाव दुकानांमधून सवलतीच्या दरात धान्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे; मात्र प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थीप्रमाणे २ रुपये किलो गहू व ३ रुपये किलो दराने तांदूळ मिळत नसल्याने, रास्त भाव दुकानांमधून मिळणाऱ्या सवलतीच्या दरातील धान्याची उचल केशरी शिधापत्रिकाधारकांकडून होत नसल्याचे वास्तव ५ मे रोजी समोर आले आहे.११ दिवसांत केवळ २११३ क्विंटल धान्य वितरित!जिल्ह्यात ५ लाख २१ हजार १२१ केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थी असून, या लाभार्थींना सवलतीच्या दरात धान्य वितरित करण्यासाठी १५ हजार ४०० क्विंटल गहू व १२ हजार क्विंटल तांदळाचा साठा मंजूर करण्यात आला. गत २४ मार्चपासून रास्त भाव दुकानांमार्फत जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थींना सवलतीच्या दरात धान्याचे वितरण सुरू करण्यात आले. ५ मे पर्यंत ११ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात केवळ १० टक्के लाभार्थींना २ हजार ११३ क्विंटल धान्याचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये १ हजार २४८ क्विंटल गहू व ८६५ क्विंटल तांदूळ वितरणाचा समावेश आहे. धान्य वितरणाचे अत्यल्प प्रमाण बघता जिल्ह्यात केशरी शिधापत्रिकाधारकांकडून सवलतीच्या दरातील धान्याची उचल होत नसल्याचे स्पष्ट होत आहे.सवलतीच्या दरातील अन्य वितरणात जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थीकडून धान्याची उचल करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. ५ मेपर्यंत जिल्ह्यात १ हजार २४८ क्विंटल गहू व ८६५ क्विंटल तांदळाची उचल लाभार्थीकडून करण्यात आली आहे. केवळ १० टक्के लाभार्थींनीच धान्याची उचल केली आहे.- बाबाराव काळे, जिल्हा पुरवठा अधिकारीप्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थीप्रमाणे २ रुपये किलो गहू व ३ रुपये किलो तांदूळ मिळत नसल्याने केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थीकडून सवलतीच्या दरातील धान्य वितरणाला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. शासनामार्फत सवलतीच्या दरात मिळणाºया धान्याचा केसरी शिधापत्रिकाधारकांनी लाभ घेतला पाहिजे.- शत्रुघ्न मुंडे, जिल्हाध्यक्ष, रास्त भाव दुकानदार संघटना.