बार्शिटाकळी: शेतकऱ्यांनीच पिकवावं व शेतकऱ्यांनीच विकावं, या धोरणाला चालना देण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने संत सावता माळी रयत बाजार अभियान अंमलात आणले. बार्शीटाकळी तालुक्यातील मौजे आळंदा येथे भाजीपाला विक्रीकरिता शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी कार्यालय आळंदा फाटा बार्शीटाकळी येथे जागा उपलब्ध करून देण्यात आली.
शेतकऱ्यांना पंचायत समिती बार्शीटाकळीचे सभापती प्रकाश वाहुरवाघ आणि पंचायत समिती सदस्य दादाराव पवार, तालुका कृषी अधिकारी दीपक तायडे यांच्या हस्ते भाजीपाला विक्रीस सावलीकरिता 'छत्री वितरण' करण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी दीपक तायडे, कृषी अधिकारी गणेश काळपांडे, कृषी पर्यवेक्षक प्रकाश मनवर, नंदकिशोर बोबडे, सहाय्यक झळके, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सचिन गायगोल उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सचिन गायगोल यांनी केले. याप्रसंगी सभापती प्रकाश वाहुरवाघ यांनी, कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा फायदा निश्चितच शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पादन वाढविण्यास होईल, असे सांगत समाधान व्यक्त केले.
फोटो: