माळेगाव बाजार: येथून जवळच असलेल्या पिंप्री माळेगाव येथील रहिवाशांनी गंभीर आजाराने मृत्युमुखी पडलेल्या एका माकडाची तेरवी साजरी करून वन्यप्राण्यांविषयीच्या भूतदयेचा परिचय दिला. पिंप्री माळेगाव येथील शेतशिवारात माकडांचे मोठे कळप वास्तव्यास आहेत. या कळपातील एक वानर गंभीर आजाराने २१ जून रोजी दगावले. यावेळी गावातील काही रहिवाशांनी माकडाचा मृतदेह गावात आणला व त्याची गावातून अंत्ययात्रा काढली. गावकर्यांनी सर्व सोपस्कारांसह या माकडावर अंत्यसंस्कार पार पाडले. त्यानंतर गावकर्यांनी माकडाची तेरवी करण्याचे ठरविले. त्यानुसार ३० जून रोजी शुद्धक्रिया आटोपून तेरवीचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी गावभोजनाचेही आयोजन करण्यात आले होते. याकरिता माजी सरपंच अशोक गायगोळ, विठ्ठल महाराज चिकटे, साहेबराव पाटील, बाळकृष्ण घरदास यांच्यासह गावकर्यांनी परिश्रम घेतले.
पिंप्री माळेगावकरांनी केली माकडाची तेरवी
By admin | Published: July 02, 2014 8:02 PM