अकोला : कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कायम असून, कृषी विभागाने २,९३६ गावांत सर्वेक्षण केले. यात १६४ गावांतील कपाशी पिकावर बोंडअळी आढळून आली आहे. राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी फरदड कापूस उत्पादन घेतल्यास या किडीचा पुढचा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकरवी वर्तविली जात आहे.राज्यातील कापसाचे क्षेत्र सरासरी ४१.९१ लाख हेक्टर आहे. तथापि, चालू खरीप हंगामात ४२.५३ लाख हेक्टरवर कापूस पिकाची लागवड करण्यात आली आहे. यात बहुतांश बीटी वाणाचा समावेश आहे. गुलाबी बोंडअळीवर पतंग आढळल्याने कृषी विभाग, विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी नोव्हेंबर महिन्यात आठ दिवस राज्यातील २,९३६ गावातील कपाशी पिकाचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी; पण १६४ गावातील कपाशी पिकावर ही गुलाबी बोंडअळी आढळून आली. या अळीला खाद्य मिळत राहिल्यास तिचे जीवनचक्र सतत पुढे चालत राहते. फरदड कापसापासून थोडेफार उत्पादन मिळत असले, तरी या किडीचा पुढील हंगामातील प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकºयांनी फरदड न घेता कपाशीच्या पºहाटी ही ग्रेडर, रोटाव्हेटर यांसारख्या यंत्राचा वापर करू न जमिनीत गाडणे क्रमप्राप्त आहे. ही उपाययोजना केल्यास जमिनीची सुपिकता वाढण्यास तसेच गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होईल. शेत पाच ते सहा महिने कापूस विरहीत ठेवल्यास बोंडअळीचे जीवनचक्र संपुष्ठात येत असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.सध्या वेचणी केलेला कापूस मार्केट यार्ड, जिनिंग- प्रेसिंग मिलमध्ये येत आहे. त्या ठिकाणीही गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाची कारवाई करणे गरजेचे आहे. म्हणूनच मार्केट यार्ड, गोडाउन, जिनिंग-पे्रसिंग मिल्स, संस्थांनी कपाशीवरील अळ््या, कोष तसेच पतंग नष्ट करावे, त्यासाठी प्रकाश, कामगंध सापळे लावण्याची नितांत गरज आहे.
यंत्रावर अनुदानकपाशीच्या पºहाट्या नष्ट करण्यासाठी यंत्रावर कृषी विभागाने अनुदान उपलब्ध करू न देण्यात आले आहे. शेतकºयांनी यंत्राचा लाभ घेण्याची गरज आहे.
गुलाबी बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकºयांनी फरदडीचा कापूस घेऊ नये, फरदड कापूस न घेतल्यास बोंडअळीचे जीवनचक्र संपुष्ठात येण्यासाठी मदत होईल. येत्या हंगामापूर्वी शेतकरी तसेच सर्व संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे मोहीम स्वरू पात तातडीने उपाययोजना करावी.- सचिंद्र प्रताप सिंह,आयुक्त, कृषी,पुणे.