अकोला : हवामान बदलामुळे विदर्भातील कापूस, या नगदी पिकाला अगोदरच विविध रोगांनी ग्रासले असताना, आता या पिकावर पिठय़ा ढेकूण (मिली बग, फेनाकोकस सोलेनोप्सीस टींसले) या जहाल किडीने हल्ला केला असून, त्यामुळे काही प्रमाणात तग धरू न असलेल्या कापसाच्या उत् पादनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.यावर्षी पावसाला विलंब झाल्याने पेरण्यांना उशिर झाला. पेरण्या झाल्यांनतर ज्यावेळी पावसाची गरज होती, त्यावेळी पाऊस आला नाही. सप्टेंबर महिना संपताच ऑक्टोबर हिटचा परिणाम पिकावर जाणवू लागला आहे. या हवामान बदलामुळे किड, रोगांसाठी पोषक वातावरण तयार झाले असून, त्याचे व्यवस्थापन करताना शेतकरी मेटाकुटीस आला आहे. पाऊस नसल्याने जमिनीतील ओलावा संपला असून, जमिनीला भेगा पडल्या आहेत. या संकटाचा सामना करीत असताना, आता नव्या रोगाचा सामना करावा तरी कसा, असा प्रश्न शेतकर्यांसमोर आहे.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने केलेल्या सर्वेक्षणातही विदर्भातील कापूस उत्पादक जिल्हयात पिठय़ा आढळून आला आहे. धुर्यावरील ही किड झपाट्याने सर्व शेतात पसरण्याची प्रक्रिया सुरू असल्याने, ग्रामस्तरावरील कृषी विस्तार कर्मचार्यांनी या किडीच्या प्रादुर्भावाविषयी स तर्क राहावे आणि शेतकर्यांनी शेतातील कपाशी पिकाचे नियमीत सर्वेक्षण करण्याचे आवाहन कृषी शास्त्रज्ञांनी केले आहे. या किडीची प्रौढ व त्यांची पिल्ले पानातील कोवळ्य़ा शेंड्यातील व फांदीतील पेशीमधून रस शोषण करतात. या किडीची प्रौढ व पिल्ले शरीरामधून साखरेच्या पाकासारखा गोड पदार्थ टाकीत असल्याने झाडावर काळी बुरशी वाढते. त्यामुळे संपूर्ण झाड चिकट व काळसर होत असल्याने पानाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये बाधा निर्माण निर्माण होते. परिणामी कापसाचे उत्पादनात घटते. त्यामुळे या किडीचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकर्यांनी उपाययोजना करण्याची गरज आहे. डॉ. पीडीकेव्हीचे किटकशास्त्रप्रमुख डॉ.डी.बी. उंदीरवाडे यांनी विदर्भातील कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये कापसावर पिठय़ा ढेकूण या किडीचा प्रादुर्भाव झाला असल्याचे सांगून ग्रामस्तरावरील कृषी विस्तार कर्मचारी आणि शेतकर्यांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली आहे. या किडीचा बंदोबस्त करण्यासाठी कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनुसार किटकनाशकांची फवारणी करण्याचे त्यांनी अवाहन केले.
कापसावर आता ‘पिठय़ा’चे आक्रमण !
By admin | Published: October 08, 2014 1:04 AM