अकोला: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळातर्फे दिवाळीपूर्व आणि दिवाळीनंतर, अशा एकूण ११० बसेसचे नियोजन केले आहे. यामध्ये सर्वाधिक बसेस पुणे-अकोला व अकोला-पुणे अशा धावणार आहेत. एसटीच्या दिवाळीपूर्व नियोजनाला शनिवार ७ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. यामध्ये पुणे येथून अकोल्यासाठी ५६, तर पुणे-वाशिम ६, अशा एकूण ६२ बसेस धावणार आहेत. तर दिवाळीनंतरच्या नियोजनाला १६ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या विशेष गाड्या २५ नाेव्हेंबरपर्यंत धावणार आहे. यामध्ये अकोला ते पुणे २४, तर वाशिम ते पुणे १६ विशेष बसेस सोडण्यात येणार आहेत. कोरोनाच्या काळात प्रवाशांची मागणी वाढल्यास तिकीट आरक्षण सेवादेखील सुरू करण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळातर्फे देण्यात आली आहे.
असे आहे एसटी बसचे वेळापत्रक
लांब पल्ल्याच्या बस
अकोला- सिडको ६.३०, पुसद ८, यवतमाळ ८.१५, १०.४५, अकाेट- पुणे ६.१५, नागपूर १६, कारंजा- मलकापूर - ०८, मंगरुळपीर - सिडको ८.३०, वाशिम- पुणे १७.३०
शिवशाही बस फेऱ्या
अकोला- नागपूर १३.३०, १४.३०, १८, १८.३०, १९.३०, अकोला ते मुंबई १६, रिसोड- नागपूर ९.८५, वाशिम- नागपूर ०७, अकोट - नागपूर ८.३०, अकोट-अमरावती ९, १५, अकोला - अमावती ८.३०, ९, १४, १४.३०