लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पंधराव्या वित्त आयोगांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा स्वच्छताविषयक कामांसाठी उपलब्ध २६ कोटी २ लाख रुपयांचा निधी जिल्ह्यातील ग्रामपंचायती आणि पंचायत समित्यांना वितरित करण्याचे नियोजन जिल्हा परिषद प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.पंधराव्या वित्त आयोगांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा आणि स्वच्छताविषयक कामांसाठी शासनामार्फत २६ कोटी २ लाख ७ हजार रुपयांचा निधी गत महिन्यात जिल्हा परिषदेला प्राप्त झाला. उपलब्ध निधीतून ८० टक्के निधी जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींना, १० टक्के निधी जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांना आणि उर्वरित १० टक्के निधी जिल्हा परिषदेला वितरित करावयाचा आहे.त्यानुषंगाने पंधराव्या वित्त आयोगांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठ्याच्या उपाययोजना आणि स्वच्छताविषयक कामांसाठी उपलब्ध निधीमधून ८० टक्के निधी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना , १० टक्के निधी जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांना वितरित करण्यासह उर्वरित १० टक्के निधी जिल्हा परिषदकडे ठेवण्याचे नियोजन जिल्हा परिषद प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.ग्रामपंचायती, पंचायत समित्यांना लवकरच निधीचे वितरण!पंधराव्या वित्त आयोगांतर्गत उपलब्ध निधीतून ८० टक्के निधी जिल्ह्यातील ग्रामपंचातींना आणि १० टक्के निधी जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांना लवकरच जिल्हा परिषदमार्फत करण्यात येणार असून, ग्रामपंचायती व पंचायत समितींच्या खात्यात निधी जमा करण्यात येणार आहे.
पाणीपुरवठा, स्वच्छतेसाठी निधी वितरणाचे नियोजन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 10:50 AM