अकोला : सेस फंडातून समाजकल्याण विभागामार्फत सन २0१५-१६ या वर्षात चार कोटींच्या योजना राबविण्याचे नियोजन जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सभेत शुक्रवारी करण्यात आले.जिल्हा परिषद सेस फंडातून २0१५-१६ या वर्षात समाजकल्याण विभागामार्फत ग्रामीण भागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांंसाठी स्पर्धात्मक परिक्षेचे वर्ग आणि जिल्ह्यातील खारपाणपट्टय़ात नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी महिला बचतगटांमार्फत जलशुद्धीकरण केंद्र सुरू करणे या नावीन्यपूर्ण योजनेसह दुग्ध व्यवसायासाठी दुधाळ जनावरांचे वाटप, शेळीपालन, टिनपत्रे, ताडपत्री, सौरकंदील व एचडीपीई पाइपचे वाटप करणे इत्यादी चार कोटींच्या योजना राबविण्याचे नियोजन या सभेत करण्यात आले. सन २0१४-१५ या वर्षात समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणार्या विविध योजनांसाठी ६ कोटी ३५ लाखांचे सुधारित नियोजनही या सभेत करण्यात आले.
समाजकल्याणच्या चार कोटींच्या योजनांचे नियोजन
By admin | Published: January 31, 2015 12:38 AM