--------------------
महिला संघामार्फत वृक्षारोपण!
बोरगाव मंजू: वटपौर्णिमेचे औचित्य साधून अकोला तालुक्यातील सम्यक सुकेशिनी महीला बहूद्देशीय संस्थेच्या वतीने वृक्षारोपण करून संगोपन करण्याचा संकल्प केला. वडाचे वृक्षारोपणासह विविध वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्यात आला. वटपौर्णिमेला वडाच्या वृक्षाचे महत्त्व असते. वडाच्या वृक्षाचे वैज्ञानिक फायदेसुद्धा आणि उपयोग तर विविध प्रकारच्या वृक्ष प्रजाती वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आल्या. अन्वी मिर्झापूर, बोरगाव मंजू, वणी रंभापूर या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. हा उपक्रम सम्यक सुकेशनी महिला संघ रमाबाई जमानिक, सविता खांडेकर, अरुणा इंगळे, लता सदांशिव, कांताबाई वानखडे, सुनंदा तायडे, रेखा तायडे, संगीता पळसपागर, कल्पना शिराळे, नंदाबाई इंगळे, इमालबाई गवई, विशाखा मनोरे, मीना सदांशिव, दीपा इंगळे, सुमन पांडे, यनुबाई आटोटे यांनी स्वखर्चाने वृक्ष उपलब्ध करून वृक्षारोपण करून वृक्षाचे संवर्धन करण्याचा संकल्प केला. वटपौर्णिमेचे औचित्य साधून ५०१ वृक्षारोपणसह संगोपन करण्याचा संकल्प केला आहे.