---------------------------------
सोयाबीन बियाणे उगवण शक्ती तपासूनच पेरणी करावी!
कृषी विभागाचे आवाहन: सिसामासा येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
डोंगरगाव: येथून जवळच असलेल्या सिसामासा येथे शेतकऱ्यांना खरीप पूर्व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कृषी सहायक नागेश खराटे यांनी सोयबीन बियाण्याची उगवण शक्ती तपासूनच पेरणी करावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमात सोयाबीन सरळ वान असल्यामुळे दरवर्षी सोयाबीन बियाणे बदलण्याची गरज नाही. त्यामळे मागील वर्षीचे सोयाबीन उगवण शक्ती तपासणी केल्यास पुन्हा यावर्षी वापरता येईल, त्याकरिता पेरणी करण्यापूर्वी उगवण शक्ती तपासूनच पेरणी करावी, असे आवाहन करण्यात आलेे. याकरिता शेतकऱ्यांना उगवण शक्ती प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. त्याबरोबर सोयाबीनचे घरचे बियाणे वापरणे, जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करणे, पेरणी करताना घ्यावयाची काळजी, बी.बी. एफ. वर पेरणी, रासायनिक खताचा जमीन आरोग्य पत्रिकेप्रमाणे वापर, सोयाबीन च्या १० वर्षा आतील वानाचा वापर, पेरणीच्या विविध पद्धती, सोयाबीन, तूर आंतरपीक पेरणी, ई. विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला तुकाराम दहातोंडे, प्रवीण फाले, संदीप फाले, ग्रामपंचायत सदस्य प्रफुल फाले उपस्थित होते. (फोटो)