महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत अकोला येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेत प्रा. डॉ. भिकाने यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयाच्या परिसरात वटवृक्षाचे रोपण करीत ‘वृक्षारोपण व संगोपन मोहीम’ राबवित अनोख्या पद्धतीने वटपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रा. डॉ. चैतन्य पावशे, प्रा. डॉ. मिलिंद थोरात, प्रा. डॉ. सुनील वाघमारे, प्रा. डॉ. सतीश मनवर यांच्यासह डॉ. प्रवीण बनकर, डॉ. महेश इंगवले, डॉ. कुलदीप देशपांडे, डॉ. रणजित इंगोले यांनी सहभाग नोंदविला.
कृती कार्यक्रमप्रसंगी उपस्थित अरुणा भिकाने, सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. नम्रता बाभुळकर, भारती पावशे, प्रज्ञा थोरात, प्रीती मनवर आणि पशुधन विकास अधिकारी डॉ. स्नेहल पाटील आदींनी वृक्षारोपण करीत अनोख्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केली. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. श्याम देशमुख, वृक्ष लागवड अधिकारी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. वैजनाथ काळे, डॉ. आनंद रत्नपारखी, डॉ. सतीश मुंडे तसेच पी. एल. ठाकूर, रामेश्वर लोथे, प्रमोद पाटील, सूर्यकांत राखुंडे, बी. जी. पाटील, सुभाष थातूरकर, आकाश गवई, अशोक तायडे इत्यादींनी परिश्रम घेतले.