शहरं
Join us  
Trending Stories
1
'बेपत्ता' कॉमेडियन सुनील पाल अखेर सापडला; दोन दिवसांपासून होता गायब, नेमकं काय घडलं?
2
दक्षिण कोरियात मार्शल लॉची घोषणा, राष्ट्रपती यून सुक-योल म्हणाले, "देशविरोधी शक्तींचा अंत होईल"!
3
शेतकऱ्यांसोबत चर्चा का नाही? उपराष्ट्रपतींनी केंद्र सरकारवरच उपस्थित केले प्रश्न! शिवराज सिंहांनाही घेतलं निशाण्यावर
4
Video: विनोद कांबळीला पाहताच सचिन तेंडुलकर भेटायला गेला, त्याला पाहून 'बालमित्र' भावूक झाला...
5
अंबाजोगाईत साडे दहा लाखांचा गुटखा पकडला; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; दोघे ताब्यात
6
शेतातील शेडवर छापा; २ लाखांचा गुटखा जप्त, एक ताब्यात; दहशतवादविराेधी शाखेची कारवाई
7
अपहरण झालेल्या दाेन मुलींची हैदराबादमधून सुटका; दाेन आराेपी अटकेत, AHTU शाखेची कारवाई
8
अमरावती विद्यापीठात अधिष्ठाता पदभरतीतून आरक्षणाचा ‘बिंदू’ गायब, अखेर 'ती' जाहिरात रद्द
9
संभल हिंसाचाराचं पाकिस्तान कनेक्शन! 3 पुरावे ओरडून-ओरडून देतायत साक्ष; फॉरेन्सिक टीमनं नाल्या खंगाळल्या
10
“निवडणुकीत आम्हाला थर्ड अंपायर मिळाला असता तर अनेक निकाल बदलले असते”: राज ठाकरे
11
UPI मुळे ATM ला फटका! 5 वर्षात प्रथमच एटीएमची संख्या घटली; ग्रामीण भागात काय स्थिती?
12
वाह.. क्या बात है! विराट-रोहितची एकत्रित नेट प्रक्टिस पाहायला ऑस्ट्रेलियन फॅन्सची गर्दी (Video)
13
निर्मला सीतारामन यांना मोठा दिलासा; कर्नाटक हायकोर्टाने रद्द केला 'इलेक्टोरल बाँड'चा खटला...
14
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी देवेंद्र फडणवीस 'वर्षा'वर; नेमकी कोणती चर्चा झाली?
15
7 कॅबिनेट मंत्रीपदं, दोन राज्यमंत्रीपदं, एक राज्यपालपद अन्...; अजित दादा काय-काय मागणार?
16
“...तर एकनाथ शिंदे कधी उद्धव ठाकरेंना सोडून बाहेर पडले नसते”; भाजपा नेत्याची टीका
17
"आपणच सर्व उत्तरं द्या...!"; मोदी सरकारमधील मंत्र्यांवर का नाराज झाले ओम बिरला? भरसंसदेत म्हणाले...
18
Pappu Yadav : मोठा खुलासा! पप्पू यादव यांना सुरक्षा मिळावी म्हणून जवळच्यांनी रचला 'धमकीचा ड्रामा'
19
Airtel आणि Jio चा 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लॅन; मिळेल फास्ट इंटरनेट
20
निर्मला सीतारामन जिथे 'निरीक्षक' म्हणून गेल्या, तिथे कसा होता भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला?

रक्तपेढ्यांमध्ये प्लेटलेट्सचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2019 3:05 PM

प्लेटलेटसाठी एका रक्तपेढीवरून दुसऱ्या रक्तपेढीकडे चकरा माराव्या लागत असल्याचे चित्र आहे.

अकोला : जिल्ह्यात डेंग्यूसदृश तापाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अशातच रक्तदात्यांअभावी शहरातील रक्तपेढ्यांमध्ये रक्त आणि रक्तघटकांचा विशेषत: प्लेटलेटचा तुटवडा असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना प्लेटलेटसाठी एका रक्तपेढीवरून दुसऱ्या रक्तपेढीकडे चकरा माराव्या लागत असल्याचे चित्र आहे.गत काही दिवसांपासून बदलत्या वातावरणामुळे साथीच्या आजारासोबतच डेंग्यूसदृश तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे साधा तापही आला, तरी रुग्ण तत्काळ रुग्णालयात धाव घेत आहे. डेंग्यूची लागण झाल्याने अनेक रुग्णांत रक्तातील प्लेटलेटची संख्या कमी होते. त्यामुळे रुग्णाला बाहेरून प्लेटलेट घ्याव्या लागतात. १ आॅक्टोबर रोजी ऐच्छिक रक्तदान दिवस साजरा करण्यात आला, तसेच ऐच्छिक रक्तदान पंधरवडाही साजरा करण्यात आला. या निमित्ताने रक्तदान शिबिर, विविध कार्यक्रम घेण्यात आले; मात्र डेंग्यूच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे होणारे रक्तदानही अपुरे पडत आहे. संकलित होणारे रक्त काही दिवसांतच संपून जात आहे. येथील शासकीय रक्तपेढीसह इतर खासगी रक्तपेढ्यांमध्येही प्लेटलेट्सचा तुटवडा असल्याचे रुग्णांच्या नातेवाइकांना सांगण्यात येते. त्यामुळे रुग्णांना प्लेटलेट्ससाठी एका रक्तपेढीतून दुसºया रक्तपेढीमध्ये चकरा माराव्या लागत आहेत. निगेटिव्ह रक्तगटाच्या रुग्णांना प्लेटलेट्स मिळणे कठीण झाल्याने रुग्णांच्या नातेवाइकांची पंचाईत झाली आहे.प्लेटलेट्सची मुदत केवळ पाच दिवसांचीजिल्ह्यातील रक्तपेढ्यांकडून बºयापैकी रक्तसंकलन केले होते. रुग्णाच्या गरजेनुसार, रक्तपेढ्यांकडून रक्ताच्या विविध घटकांचा पुरवठा केला जातो; मात्र प्लेटलेट्सची मुदत केवळ पाच दिवसांची असल्याने रक्तातील हा घटक जास्त प्रमाणात साठवून ठेवण्यात येत नाही.प्लेटलेट्सचा तसा तुटवडा नाही. रक्तातील प्लेटलेट्सची मुदत केवळ पाच दिवसांची असल्याने ते जास्त प्रमाणात साठवून ठेवणे शक्य नाही. रुग्णांची संख्या वाढल्यास काही ठिकाणी अडचणी येऊ शकतात. रुग्णांच्या नातेवाइकांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, जेणेकरून इतर रुग्णांना योग्य वेळी रक्त व प्लेटलेट्स मिळतील.- डॉ. महेंद्र तामने, अध्यक्ष, डॉ. हेडगेवार रक्तपेढी, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाBlood Bankरक्तपेढी