अकोला: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थी शेतकºयांची यादी तयार करण्याचे काम ९७.८५ टक्के पूर्ण करण्यात आले असून, पहिल्या टप्प्यातील मदतीची रक्कम लवकरच लाभार्थी शेतकºयांच्या थेट खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रविवारी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी प्रामुख्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण वाघमारे, तहसीलदार विजय लोखंडे उपस्थित होते. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकºयांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत लाभार्थी शेतकºयांची यादी तयार करण्याचे काम ९७.८५ टक्के पूर्ण करण्यात आले आहे. ‘पीएम-किसान’ योजना शेतकºयांच्या सन्मानाची योजना असून, योजनेच्या लाभासंदर्भात अडचणी असल्यास लाभार्थी शेतकºयांनी ग्राम, तालुका व जिल्हा पातळीवर गठित समितीकडे तक्रार करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. त्यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनीही विचार मांडले. जिल्ह्यातील १ लाख १३ हजार शेतकरी कुटुंबांच्या खात्यात ‘पीएम-किसान’ योजनेचा लाभ पोहोचणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण वाघमारे, संचालन नंदू वानखडे व आभार तहसीलदार विजय लोखंडे यांनी मानले. या कार्यक्रमात उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ करण्यात आल्याच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक व प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते.कमी खर्चात जास्त उत्पादन देणारी शेती करा!शेतकºयांनी अभिनव पद्धतीचा वापर करून कमी खर्चात जास्त उत्पादन देणारी शेती करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी केले.१.१३ लाख शेतकरी कुटुंबांची माहिती ‘अपलोड’!प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थी शेतकºयांच्या याद्या तयार करण्याच्या प्रक्रियेत आतापर्यंत १ लाख १३ हजार ४३८ शेतकरी कुटुंबांची माहिती शासनाच्या ‘पीएम-किसान’ पोर्टलवर ‘अपलोड’ करण्यात आली आहे.