अकोला: पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ज्या नागरिकांनी मनपाकडे अर्ज केले नाहीत, त्यांच्यासाठी खुले नाट्यगृह कार्यालयात अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत १० जुलै असून, या ठिकाणी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत इच्छुकांचे अर्ज स्वीकारल्या जाणार आहेत. केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ‘सर्वांसाठी घरे’ उपलब्ध करून दिले जाणार आहेत. चार टप्प्यात राबवल्या जाणाऱ्या योजनेत सर्वप्रथम झोपडपट्टीतील गरजू लाभार्थींना प्राधान्य देण्यात आले आहे. योजनेचा आवाका मोठा असून, पात्र लाभार्थींसाठी घरे उभारणे, दुसऱ्या टप्प्यात लाभार्थींना एकत्र करून त्यांच्यासाठी इमारतींमध्ये सदनिकांचे निर्माण करण्याचा समावेश राहील. लाभार्थींची स्वत:ची जागा असेल तर त्या जागेवरही घर उभारण्यासाठी अनुदान दिले जाईल. त्यासाठी पात्र लाभार्थींना बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून देण्याची तजवीज करण्यात आली आहे. आजपर्यंत ५८ हजार लाभार्थींनी मनपाकडे अर्ज सादर केल्याची माहिती आहे. अद्यापही ज्या नागरिकांना घरासाठी अर्ज सादर करायचा असेल त्यांच्यासाठी खुले नाट्यगृह कार्यालयात अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
‘पीएम’आवास; अर्ज सादर करण्यासाठी १० जुलैपर्यंत मुदत
By admin | Published: July 07, 2017 1:56 PM