अकोला : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत दोन हेक्टरपर्यंत शेतजमिनीची मर्यादा शिथिल करण्यात आली असून, सरसकट सर्व शेतकरी कुटुंबांना प्रतिवर्ष तीन समान हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सातही तालुक्यांत दोन हेक्टरच्यावर शेतजमीन असलेल्या सर्व शेतकरी कुटुंबांची माहिती संकलित करण्याचे काम १७ जूनपासून जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात आले असून, ६ जुलैपर्यंत जिल्ह्यातील दोन हेक्टरच्यावर शेतजमीन असलेल्या ५० हजार ९१ शेतकरी कुटुंबांची नोंदणी करण्यात आली आहे.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत यापूर्वी दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकरी कुटुंबांना योजनेचा लाभ देण्यात येत होता. दोन हेक्टर शेतजमिनीची मर्यादा शिथिल करून योजनेंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबांना प्रतिवर्ष तीन समान हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये वितरित करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला. त्यानुसार ‘पीएम-किसान’ सन्मान निधी योजनेंतर्गत शेतजमीन क्षेत्राच्या मर्यादेची कोणतीही अट नसल्याने जिल्ह्यातील दोन हेक्टरपेक्षा अधिक शेतजमीन असलेल्या सर्व शेतकरी कुटुंबांची माहिती संकलित करण्याचे काम गत १७ जूनपासून जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात आले. तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या पथकांमार्फत दोन हेक्टरपेक्षा अधिक शेतजमीन असलेल्या शेतकरी कुटुंबांची माहिती संकलित करण्यात आली असून, या माहितीच्या आधारे ६ जुलैपर्यंत ‘पीएम-किसान’ योजनेंतर्गत जिल्ह्यातील दोन हेक्टरच्यावर शेतजमीन असलेल्या ५० हजार ९१ शेतकरी कुटुंबांची नोंदणी करण्यात आली आहे.शेतकरी कुटुंबांची माहिती पीएम-किसान पोर्टलवर अपलोड!प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यात दोन हेक्टरच्यावर शेतजमीन असलेल्या ५० हजार ९१ शेतकरी कुटुंबांची नोंदणी करण्यात आली असून, नोंदणी करण्यात आलेल्या शेतकरी कुटुंबांची माहिती ‘पीएम-किसान’ पोर्टलवर जिल्हा प्रशासनामार्फत अपलोड करण्यात आली आहे.दोन हेक्टरवरील शेतकरी कुटुंबांची अशी आहे तालुकानिहाय नोंदणी!तालुका शेतकरीअकोला ९५७०बार्शीटाकळी ६९५३अकोट ८०६२तेल्हारा ४९०२बाळापूर ५७२८पातूर ४६७८मूर्तिजापूर १०१९८.............................................एकूण ५००९१