अकोला : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत मंगळवार, २१ जानेवारी रोजी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकºयांची माहिती ‘एनआयसी’ पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत पात्र लाभार्थी शेतकºयांची नावे, बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक यासंदर्भात असलेल्या त्रुटीची दुरुस्ती करून आधार कार्डवरील नावाप्रमाणे शेतकºयांची माहिती अद्ययावत करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत मंगळवार, २१ जानेवारी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सातही तहसीलदारांकडून गावनिहाय कर्मचाºयांची नेमणूक करण्यात आली असून, सेतू सुविधा केंद्रचालकही गावांमध्ये उपस्थित राहणार आहेत. यासोबतच तालुकानिहाय तांत्रिक कर्मचाºयांची नियुुक्ती करण्यात आली असून, १५ गावांसाठी एक याप्रमाणे नियंत्रण अधिकाºयांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुषंगाने या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील शेतकºयांनी गावात येणाºया संबंधित कर्मचाºयांकडे आधार कार्डची झेरॉक्स देऊन, नावात दुरुस्ती व इतर त्रुटीसंदर्भात माहिती देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.तालुकानिहाय नोडल अधिकाºयांची नियुक्ती !प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकºयांची माहिती अद्ययावत करण्यासाठी राबविण्यात येणाºया विशेष मोहिमेत जिल्हा प्रशासनामार्फत तालुकानिहाय नोडल अधिकाºयांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये निवास उपजिल्हाधिकारी संजय खडसे-अकोला तालुका, उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे-बार्शीटाकळी तालुका, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले-बाळापूर तालुका, उपजिल्हाधिकारी राहुल वानखडे-पातूर तालुका, कृषी उपसंचालक अरुण वाघमारे-अकोट तालुका, जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड-मूर्तिजापूर तालुका व जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अलोक तारेणीया-तेल्हारा तालुका नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.