- संतोष येलकरअकोला : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या जिल्ह्यातील १ लाख १५ हजार ९०२ शेतकºयांचे अर्ज गत १५ फेबु्रवारीपर्यंत शासनाच्या ‘पीएम-किसान’ पोर्टलवर ‘अपलोड’ करण्यात आले. अडीच महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र अर्ज केलेल्या काही मोजक्याच शेतकºयांना बँक खात्यात मदतीच्या पहिल्या हप्त्यापोटी दोन हजार रुपयांची रक्कम जमा झाल्याचे ‘एसएमएस’ आले असून, उर्वरित बहुतांश शेतकºयांना रक्कम जमा झाल्याचे ‘एसएमएस’ अद्याप आले नाही. त्यामुळे लाखावर शेतकºयांचे अर्ज अपलोड करण्यात आले असले, तरी त्यापैकी किती शेतकºयांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात आली, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकºयांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत जमा करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात शासनामार्फत करण्यात आली होती. या योजनेच्या अंमलबजावणीत जिल्हा प्रशासनामार्फत गत १५ फेबु्रवारीपर्यंत जिल्ह्यातील दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या १ लाख १५ हजार ९०२ शेतकºयांचे अर्ज शासनाच्या ‘पीएम-किसान पोर्टल’वर अपलोड करण्यात आले. शेतकºयांच्या याद्या अपलोड करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर मदतीच्या सहा हजार रुपयांपैकी पहिल्या हप्त्यात दोन हजार रुपयांची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया गत फेबु्रवारीअखेर शासनामार्फत सुरू करण्यात आली. त्यामध्ये मदतीच्या पहिल्या हप्त्यात दोन हजार रुपयांची रक्कम बँक खात्यात जमा करण्यात आल्याचे ‘एसएमएस’ जिल्ह्यातील काही मोजक्याच शेतकºयांना आले. उर्वरित बहुतांश शेतकºयांना मात्र मदतीच्या पहिल्या हप्त्यापोटी दोन हजार रुपयांची रक्कम बँक खात्यात जमा झाल्याचे ‘एसएमएस’ अद्यापही आले नाही. त्यामुळे पीएम-किसान सन्मान निधी योजनेंतर्गत प्रतिवर्ष सहा हजार रुपये मदतीसाठी जिल्ह्यातील १ लाख १५ हजार ९०२ शेतकºयांनी अर्ज केले असले, तरी त्यापैकी किती शेतकºयांच्या खात्यात मदतीच्या पहिल्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.तालुकानिहाय अर्ज केलेले असे आहेत शेतकरी!तालुका शेतकरीअकोला १७२७२बार्शीटाकळी १५६८२अकोट २०९८०तेल्हारा १८४३९बाळापूर १६२६७पातूर १३४१९मूर्तिजापूर १३८४३..............................................एकूण ११५९०२