बळीराजा
तू जगाचा पोशिंदा ....
जग उपाशी राहू नये
म्हणून
स्वतः उपाशी राहून
पेरतोस आपल्या घासातला दाणा
काळ्या मातीत ....!
साऱ्या इच्छा आकांक्षा अपेक्षा
खत म्हणून दाबतो मातीत
दाण्यासोबत
भरघोस पिकासाठी ....!
या धुंदीत बायकोपोरांसोबत
वागतोस त्रयस्थासारखा
नुसती आश्वासनांची खिरापत ,,,,
सारा पैसा ओततो पिकात
अन्
काळ्या मातीच्या भरवश्यावर
रेघोट्या आखतो
सोनेरी भविष्याच्या .... !!!!
डॉ. विनय वसंतराव दांदळे, अकाेला़
-----
मनाच्या जखमांना मीत्रा,
मी काळजीने जोपासतो आहे
एकांतात मी स्वतःलाच,
न्याहाळतो आहे
गेलेला काळ ही मीत्रा,
माझ्यावर हसुनी गेला
हसतो आहे वर्तमान ही कधी कधी
मात्र भविष्या ला मी रोखणार आहे
पानगळ आयुष्याची,
आत्ताच कुठे संपली.
पुन्हा आता बहरण्याला,
थोडा फार अवकाश आहे
मनाच्या जखमांना मीत्रा,
मी काळजीने जोपासतो आहे,
गतकाळाच्या स्मृतीत मी,
स्वतालाच न्याहाळतो आहे
अंतरंगात दुनियेच्या रंग ,
माझा मीच शोधतो आहे
मनाच्या जखमांना मित्रा,
मी काळजीने जोपासतो आहे
संतोष. कि. इंगळे
अकोला.