अकोला: सार्वजनिक ठिकाणी घाण करणे, थुंकणे, यासारख्या प्रकारासाठी मुंबई पोलीस अधिनियमात कारवाईची तरतूद असली तरी त्याचा वापर पोलीस किंवा इतरांकडूनही क्वचितच होतो. कायद्यातील या तरतुदीमुळे जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहात लघुशंका करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात गेले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या तक्रारीवरून सिव्हिल लाइन्स पोलिसांनी संबंधित व्यक्तीवर कारवाई केली.सिव्हिल लाइन परिसरात जिल्हा परिषदेचे विश्रामगृह आहे. त्या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह पदाधिकारी सोमवारी सकाळी पाहणीसाठी गेले होते. त्यावेळी एक व्यक्तीने विश्रामगृह परिसरात पदाधिकारी, अधिकारी उपस्थित असताना लघुशंका केली. ही बाब मुख्य कार्यकारी अधिकाºयांना आढळून आली. त्याच्याविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. त्याच्यावर पोलिसांनी मुंबई पोलीस अधिनियमातील कलम ११५ (अ) नुसार कारवाई केल्याचेही मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी सांगितले.
जिल्हा परिषेदेच्या विश्रामगृहात लघुशंका करणाऱ्यावर पोलीस कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 2:03 PM