अकाेला : जिल्ह्यात वाढत्या मालमत्तेच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात ९ मार्चच्या रात्री अचानक नाकाबंदी करण्यात आली. त्यानंतर कोबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यामध्ये ४२ पाेलिस अधिकाऱ्यांसह २४० पाेलिस अंमलदारांनी सहभागी हाेत रात्रभर कारवाईचा सपाटा लावला. या दरम्यान ५३६ वाहनांची तपासणी करीत ९१ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यात वाढलेल्या चाेरीच्या घटना राेखण्यासाठी पाेलिसांनी कंबर कसली असून पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या संकल्पनेत अपर पोलिस अधीक्षक अभय डाेंगरे, सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस निरीक्षक शहर वाहतूक शाखा, सर्व ठाणे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी यांनी काेबिंग ऑपरेशनमध्ये सहभाग घेऊन कारवाई केली. नाकाबंदी दरम्यान रिफलेक्टर जॅकेट व टॉर्च घेऊन नाकाबंदीत बॅरीकेटिंग करून तपासलेले प्रत्येक वाहनाचा क्रमांक व चालकाचे नाव, पत्ता व मोबाइल क्रमांक घेऊन दुचाकी २९७ व चारचाकी २३९ अशा प्रकारे एकूण ५३६ वाहने चेक करून त्यापैकी ९१ वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ३७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ६८ निगराणी बदमाश व २९ माहितीगार गुन्हेगार चेक करण्यात आले. कलम १२२ महाराष्ट्र पोलिस कायदा याप्रमाणे ९ कारवाई, भारतीय हत्यार कायद्यान्वये ०५ कारवाई करण्यात आली. कलम ३३ आर डब्ल्यू प्रमाणे ०१ कारवाई, कलम ११०,११७ प्रमाणे एकूण ४३ कारवाया करण्यात आल्या.
जिल्ह्यातील ५७ हाॅटेलची तपासणीकाेबिंग ऑपरेशन दरम्यान जिल्ह्यातील ५७ हॉटेल लॉजेस व ५३ एटीएमची तपासणी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी, अंमलदार यांनी सहभाग घेऊन कारवाई केली. यासाेबतच एका तडीपार इसमास अटक केली असून सतत अशा प्रकारचे कोबिंग ऑपरेशन व नाकाबंदी जिल्ह्यात सुरूच राहणार असल्याचे पाेलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले.